आयपीएल (IPL) 2025च्या मेगा लिलावात न विकल्या गेलेल्या उर्विल पटेलने (Urvil Patel) सय्यद मुश्ताक अली (Syed Mushtaq Ali Trophy) टी20 स्पर्धेत आणखी एक विस्फोटक शतक झळकावले आहे. मंगळवारी (3 डिसेंबर) गुजरातकडून खेळताना उर्विल पटेलने 41 चेंडूत 115 धावांची नाबाद खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 11 षटकारांसह 8 चौकार मारले. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक आहे. त्याआधी त्याने अवघ्या 28 चेंडूत शतक झळकावले होते.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर त्याने मंगळवारी (3 डिसेंबर) झालेल्या सामन्यात उत्तराखंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 182 धावा केल्या. रविकुमार समर्थ 54, आदित्य तरे 54 धावा या खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. उत्तराखंडने गुजरातसमोर विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दरम्यान उर्विल पटेलच्या (Urvil Patel) विस्फोटक खेळीच्या जोरावर गुजरातने 13.1 षटकात 2 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
इंदूरमधील एमराल्ड हायस्कूल मैदानावर उजव्या हाताचा फलंदाज उर्विल पटेलने अवघ्या 41 चेंडूत नाबाद 115 धावा केल्या. गुजरातने सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीमध्ये उत्तराखंडवर शानदार विजय मिळवला. उर्विलने अवघ्या 36 चेंडूत शतक झळकावले. यापूर्वी (27 नोव्हेंबर) रोजी उर्विलने त्रिपुराविरूद्ध केवळ 28 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने 35 चेंडूंमध्ये 113 धावांची खेळी केली होती.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील सर्वात जलद शतक-
28 चेंडू- उर्विल पटेल 2024 मध्ये
32 चेंडू- रिषभ पंत 2018 मध्ये
36 चेंडू- उर्विल पटेल 2024 मध्ये
महत्त्वाच्या बातम्या-
18 वर्षाच्या फलंदाजाने आशिया कपमध्ये रचला इतिहास, उन्मुक्त चंदचा विश्वविक्रम मोडीत
सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी चॅम्पियन खेळाडू होणार नववधू, या दिवशी लग्न बंधनात अडकणार
IND vs JAP, U19 Asia Cup: टीम इंडियाचा शानदार विजय, जपानला लोळवले; कर्णधाराची शतकी खेळी!