जगभरात असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, जे एका सामन्यातून लाखो रुपये कमावतात. त्यांची वर्षाची कमाईही काही करोडोंमध्ये असते. अगदी भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या विराट कोहलीची वर्षाची कमाई २०० कोटींच्या आसपास आहे. पण जर आपल्याला कोणी असे सांगितले की एका बॉक्सरने केवळ एका सामन्यातून तब्बल ७४३ कोटी रुपयांची कमाई केली, तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरे आहे. त्याची एका सामन्याची कमाई विराटच्या वार्षिक कमाईपेक्षा जवळपास तिप्पट होती.
अमेरिकेचा दिग्गज व्यावसायिक बॉक्सर फ्लॉयड मेवेदरने एका सामन्यातून तब्बल १०० मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास ७४३ कोटींची कमाई केली आहे. याचा खुलासा स्वत: मेवेदरनेच केला आहे. विशेष म्हणजे या सामन्यातील लढाई खोटी होती.
फ्लॉयल मेवेदरचा ६ जून रोजी प्रसिद्ध युट्यूबर लॉगन पॉलबरोबर प्रदर्शनीय रिंग फाईट झाली होती. या फाईटमधून मेवेदरला १०० मिलियची कमाई झाली. या फाईटनंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्याने स्वत: सांगितले होते की ही एक खोटी फाईट होती.
Floyd Mayweather boasting about making $100million for his exhibition with Logan Paul after Gervonta Davis' win…
[📽️ @ShowtimeBoxing] pic.twitter.com/nehjApdnUL
— Michael Benson (@MichaelBensonn) June 27, 2021
फ्लॉयल मेवेदर आणि लॉगन पॉल यांच्यातील सामना ८ राऊंडपर्यंत सुरु होता. खास गोष्ट म्हणजे युट्यूबर लॉगन पॉलला मेवेदर एकदाही नॉकआऊट करु शकला नव्हता.
प्रोफेशनल बॉक्सर असलेल्या मेवेदरने २०१७ साली निवृत्ती स्विकारली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत ५० सामने खेळले होते आणि एकाही सामन्यात त्याचा पराभव झाला नव्हता. मेवेदरचे राहणीमान आलिशान असून त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तसेच त्याच्याकडे ३३४ कोटी रुपयांचे एक स्वत:चे जेट आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाचा साऊदी! ८ वर्षीय चिमुकलीसाठी करणार WTC फायनलमधील जर्सीचा लिलाव
WTC फायनलनंतर विराटची गळाभेट घेतानाच्या व्हायरल झालेल्या फोटोवर विलियम्सनने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया