टेनिस विश्वातील 2022मधील शेवटची ग्रँड स्लॅम यूएस ओपनमध्ये सोमवारी (5 सप्टेंबर) पुरूषांच्या एकेरीचा चौथा राऊंड रंगला. ऑस्ट्रेलियाचा स्टार निक किर्गियोस हा यावर्षी चागंलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने गतविजेता डॅनियल मेदवेदेव याला पराभवाचा धक्का देत यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 53 मिनिटे चाललेल्या या सामन्यात किर्गियोसने मेदवेदेवचा 7 (13)-6 (11), 3-6, 6-3, 6-2 असा पराभव केला आहे.
डॅनियल मेदवेदेव (Daniil Medvedev) याचा हा पराभव म्हणजे त्याचे 2000 गुण कमी होणार आहेत. हे गुण त्याने मागील वर्षी पहिले ग्रँण्ड स्लॅम जिंकल्यावर कमावले होते. त्याचबरोबर त्याचे जागतिक क्रमवारीतील स्थानही धोक्यात आले आहे. तो यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात एटीपी क्रमवारीत पहिले स्थान गाठले होते. त्याने पत्रकारांना संबोधत म्हटले, “मी इथे चांगले खेळण्याचा प्रयत्न केला मात्र माझी निराशा झाली.”
निक किर्गियोस (Nick Kyrgios) याचा हा मेदवेदेव विरुद्ध तिसरा विजय ठरला आहे. सामन्यानंतर किर्गियोस म्हणाला, “मी चांगल्याप्रकारे खेळ केला. मी अविश्वसनीयरित्या सामन्यात परतलो. मी फक्त खेळण्याचा आनंद घेतला, ज्या प्रकारे मी विजय मिळवला याचा मला गर्व आहे.”
Serving for the US Open quarterfinals, Nick Kyrgios delivered this. 🥶️@Heineken Serve of the Day | #USOpen pic.twitter.com/ONXF2fGqY7
— US Open Tennis (@usopen) September 5, 2022
स्पेनचा राफेल नदाल (Rafael Nadal) हा सध्या एटीपी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर पुढच्या सोमवारी जेव्हा नवी क्रमवारी येईल तेव्हा तो पहिल्या स्थानावर जाईल. कारण तो 2019नंतर प्रथमच हार्ड कोर्टवर खेळत आहे.
एटीपी कर्मवारीत चौथ्या क्रमांकावरचा कार्लोस अल्कारझ आणि सातव्या क्रमांकावरचा नॉर्वेचा कॅस्पर रुड (Casper Ruud) यांनीही आपापले सामने जिंकत गुण कमावले आहेत. त्यामुळे त्यांच्या क्रमवारीतदेखील बदल दिसणार आहेत.
King Kyrgios and his court. pic.twitter.com/y5GYBiIxlh
— US Open Tennis (@usopen) September 5, 2022
मेदवेदेवसाठी 2022वर्ष निराशाजनक ठरले आहे. त्याला वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपनच्या अंतिम सामन्यात नदाल विरुद्ध पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर तो फ्रेंच ओपनमधूनही चौथ्या फेरीतच बाहेर झाला. तर विम्बल्डनमध्ये रशियाच्या खेळाडूंवर बंदी घालण्यात आल्याने त्याला या मोठ्या स्पर्धेला (ग्रास कोर्ट) मुकावे लागले.
Back-to-back 🔥 points@NickKyrgios & @DaniilMedwed are electrifying Ashe! pic.twitter.com/cXYd22S3dS
— US Open Tennis (@usopen) September 5, 2022
मेदवेदेवने मागील वर्षी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने 2020-21मध्ये सलग 20 सामने जिंकले होते. यातील 12 विजय क्रमवारीतील पहिल्या दहा खेळाडूंविरुद्ध होते. तसेच त्याने एकेरीतील 14 पैकी 13 विजेतेपद हार्ड कोर्टवरच जिंकले आहेत. त्यामुळे त्याचा हा पराभव चकित करणारा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेमिमाला ‘बर्थ डे’ गिफ्ट! वुमेन्स आयपीएलमध्ये खेळणार मुंबई इंडियन्ससाठी?
शिक्षक दिन | योग्य मार्गदर्शनामुळे ‘या’ दिग्गजांनी केले देशाचे नाव, खास पोस्ट करून दिल्या शुभेच्छा
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा संपूर्ण कार्यक्रम झाला जाहीर; या शहरांत होणार सामने