---Advertisement---

अफगाणिस्तानमधील अमेरिकन जवानामुळे स्टीव्ह स्मिथ होतोय ट्रेंड, वाचा नक्की काय आहे प्रकरण

On: रविवार, ऑगस्ट 22, 2021 2:58 PM
Steve-Smith
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू स्टीव स्मिथ गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे क्रिकेट मैदानापासून दूर होता. असे असले तरी, तो सध्या एका वेगळ्याच कारणाराठी चर्चेत आला आहे. सध्या स्मिथ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे. त्याचे कारण अफगाणिस्तानमधील यूएस आर्मीचा एक जवान आहे.

सध्या अफगानिस्तानवर तालिबानने कब्जा केला आहे. अशात या जवानाचा एक फोटो समोर आला आहे. फोटोत जवान लहान मुलाना वाचवायचे काम करत आहे. या जवानाचा चेहरा क्रिकेटर स्टीव स्मिथ याच्याशी मिळताजुळता आहे. यामुळे हा फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर वापरकर्ते स्टीव स्मिथविषयी ट्विटरवर खुप ट्विट करत आहेत. एका वापरकर्त्याने विचारले आहे स्टीव स्मिथ यूएस आर्मीत काय करत आहे? तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, स्टीव स्मिथ अफगाणिस्तानमध्ये ड्युटीवर असल्यामुळे आयपीएलला मुकू शकतो. सध्या अफगाणिस्तानवर तालिबानने पुन्हा कब्जा मिळवला आहे. त्यामुळे तेथे अफरातफरीची परिस्थिती आहे. तेथील लोक देशाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न  करत आहेत. विमानतळावर लोकांची गर्दीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ साठी ऑस्ट्रेलिया संघाने गुरुवारी त्यांचा १५ सदस्यांचा संघ घोषित केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या संघाचे नेतृत्व कर्णधारपद ऍरॉन फिंच करेल. स्टीव स्मिथचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. टी२० विश्वचषक यूएई आणि ओमान या दोन ठिकाणी आयोजित केला गेला आहे.

त्याआधी स्टीव स्मिथ आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना दिसू शकतो. तो सध्या त्याच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतिशी झगडत आहे. आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने सुरू होण्याच्या आधी तो ठीक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘द हंड्रेड’ महिला स्पर्धेचे पहिले विजेतेपद ओव्हल इन्विन्सिबल्सकडे; ‘या’ खेळाडू सामनावीर, मालिकावीर पुरस्काराच्या मानकरी

आता माझी सटकली! विराटने इशारा करताच मोहम्मद सिराजने ‘सिंघमचे’ रूप केले धारण, पाहा व्हिडिओ

बटलर राजस्थान संघातून बाहेर; न्यूझीलंडच्या ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाला मिळाली बदली खेळाडू म्हणून संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---