ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा बुधवारी संघासोबत भारतात दाखल होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ बुधवारी (1 फेब्रुवारी) भारतात दाखल झाला, पण सलामीवीर उस्मान ख्वाजा मात्र त्यांच्यासोबत नव्हता. मुळचा पाकिस्तानचा असलेल्या ख्वाजाला व्हिसा वेळेवर न मिळाल्यामुळे त्याला संघासोबत भारतात येता आले नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याविषयी चाहत्यांना सविस्तर माहिती दिली.
Let's go boys! 💪🇦🇺 https://t.co/88oAnYO3Zl
— Cricket Australia (@CricketAus) February 1, 2023
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (Cricket Australia) प्रवक्त्यांनी सांगितले की, “पाकिस्तानमध्ये जन्मलेला उस्मान ख्वाजा एकमेव खेळाडू आहे, जो संघासोबत गेला नाहीये. कारण त्याचा वीजा वेळेवर मिळू शकला नाही.” संघासोबत भारताला रवाना होता आले नाही म्हणून उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) देखील चांगलाच नाराज झाला. संघ भारतासाठी त्याच्याआधी रवाना झाल्यानंतर ख्वाजाने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून खास मीम शेअर केली. मीममध्ये एक व्यक्ती बागेत एकटाच बनसल्याचे दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये ख्वाजाने लिहिले की, “भारताचा वीजा मिळण्यासाठी वाट पाहताना मी….#stranded #dontleaveme #standard #anytimenow.”
https://www.instagram.com/p/CoGk_VxPoCV/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलिया अपेक्षा आहे की बुधवारी उशीरा ख्वाजाला भारताचा वीजा मिळेल. अशात गुरुवारी ख्वाजासाठी भारताचे तिकिट बुक केले गेले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाला भारत दौऱ्यात चार सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. कसोटी मालिका 9 फेब्रुवारी रोजी सुरू होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये केळला जाईल. कसोटी मालिकेत ख्वाजाची भूमिका महत्वाची असेल.
सोमवारी (30 जानेवारी) पार पडलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पुरस्कार समारंभात देखील ख्वाजाला विशेष सन्मान मिळाला. उस्मान ख्वाजा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून दिल्या जाणाऱ्या कसोटी प्लेअर ऑफ द ईयर पुरस्काराचा मानकरी ठरला. मागच्या 12 महिन्यांमध्ये ख्वाजाला 78.45 च्या सरासरीने आणि 1020 धावा केल्या आहेत. अशात कसोटी मालिकेत भारतीय संघासाठी ख्वाजा हे मोठे आव्हान असेल. (Usman Khawaja missed the flight as he did not get his visa to India in time)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! धोनीने खेळाडूंना दिलेली संघातून वगळण्याची धमकी, माजी प्रशिक्षकाचा नवा खुलासा
फलंदाजांना धडकी भरवणारा कीवी गोलंदाजही झाला पंड्याच्या कॅप्टन्सीचा फॅन; म्हणाला, ‘त्याने भारतासाठी…’