---Advertisement---

Ashes | धडाक्यात पुनरागमन काय असतं ते ‘उस्मान ख्वाजा’ने दाखवलंय, लागोपाठ दोन शतकांसह मोठा विक्रम नावावर

Usman Khawaja
---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात सध्या ७२ वी ऍशेस मालिका सुरू असून मालिकेतील चौथा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजाने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही शतकी खेळी करत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. 

ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ६ बाद २६५ धावांवर घोषित केला आहे. या डावात ऑस्ट्रेलियाकडून ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उस्मान ख्वाजा याने (Usman Khawaja) १३८ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि २ षटकर मारले. त्याने ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात देखील ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३७ धावांची खेळी केली होती.

विशेष म्हणजे जवळपास अडीच वर्षांनी ख्वाजाचे ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ जणांच्या संघात पुनरागमन झाले आहे. त्याने यापूर्वी अखेरचा कसोटी सामना लीड्समध्ये इंग्लंडविरुद्धच ऑगस्ट २०१९ मध्ये खेळला होता.

ख्वाजाच्या नावावर मोठा विक्रम
ख्वाजाने सिडनी कसोटीत (Sydney Test) खेळताना दोन्ही डावात शतक केल्याने त्याने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणारा केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम फक्त रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आणि डग वॉल्टर्स (Doug Walters) यांनाच करता आला आहे. 

पाँटिंगने २००६ साली सिडनीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२० आणि नाबाद १४३ धावांची खेळी केली होती. तसेच वॉल्टर्स यांनी १९६९ साली वेस्ट इंडिज विरुद्ध २४२ आणि १०३ धावांची खेळी केली होती.

अधिक वाचा – भर मैदानात जागा झाला उस्मान ख्वाजातील डान्सर, दर्शकांपुढे केला भारी ‘मूनवॉक’; व्हिडिओ व्हायरल

दिग्गजांच्या यादीत ख्वाजाचा समावेश 
याशिवाय ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियासाठी दोन्ही डावात शतक करणारा ख्वाजा ६ वा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वॉरेन ब्रॅड्सली (१९०९), अर्थर मॉरीस (१९४७), स्टीव्ह वॉ (१९९७), मॅथ्यू हेडन (२००२) आणि स्टीव्ह स्मिथ (२०१९) या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी असा विक्रम केला आहे.

तसेच ऍशेस कसोटीत दोन्ही डावात शतक (Centuries in Both Innings) करणारा तो एकूण ९ वा खेळाडू आहे. इंग्लंडकडून हबर्ट सटक्लिफ, वॅली हॅमंड आणि डेनिस कॉम्प्टन यांनी असा विक्रम केलेला.

त्याचबरोबर ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ऍशेस कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणारा ख्वाजा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी स्टीव्ह वॉ यांनी १९९७ साली, तर डेनिस कॉम्प्टन यांनी १९४७ साली असा पराक्रम केलेला.

व्हिडिओ पाहा – टोकियो ऑलिम्पिक… भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा

ऑस्ट्रेलियाचे सिडनी कसोटीत वर्चस्व
सध्या सुरू असलेल्या ७२ व्या ऍशेस मालिकेतील (Ashes Test Series) चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २६५ धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील १२२ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर ३८८ धावांचे आव्हान ठेवले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केला होता, तर इंग्लंडचा पहिला डाव २९४ धावांवर संपुष्टात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण! आता तिसऱ्या कसोटीत ‘या’ खेळाडूच्या उपस्थितीवर उभे राहिले प्रश्नचिन्ह

विराटचे केपटाऊन कसोटीत खेळणे जवळपास पक्केच, पण मग संघाबाहेर होणार कोण? ‘हे’ आहेत ४ पर्याय

‘क्रमांक ७ अजूनही मन जिंकतोय’, धोनीकडून ‘हे’ गिफ्ट मिळताच पाकिस्तानी गोलंदाजाचे इमोशनल ट्वीट

टोकियो ऑलिम्पिक... भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा | India at Tokyo Olympics 2020

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---