दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला नाही. उभय संघांतील हा तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला आणि अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्या वादळी खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभी केली. मात्र, कर्णधाराने डाव घोषित केल्यानंतर ख्वाजाचे द्विशतक अवघ्या 5 धावांनी हुकले. सामना अनिर्णित झाल्यानंतर ख्वाजा याविषयी माध्यमांसमोर बोलला.
ऑस्ट्रेलियासाठी या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यांचा सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. ख्वाजाने पहिल्या डावात 368 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 195 धावा कुटल्या. तसेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्टीव स्मित (Steve Smith) याने 105 धावांची महत्वापूर्ण खेळी केली. उभय संघांतील हा सामना 4 जानेवारीला सुरू झाला असून शेवटच्या दिवशी म्हणजेच 8 जानेवारीला सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात चार बाद 475 धावा केल्या. प्रत्युत्तार दक्षिण आफ्रिका संघ दोन डावांमध्ये मिळूनदेखील एवढ्या धावा करू शकला नाही. उस्मान ख्वाजा द्विशतकापासून अवघ्या पाच धावांच्या अंतरावर असताना ऑस्ट्रेलियन संघाने डाव घोषित केल्यामुळे त्याचे द्विशतक होऊ शकले नाही.
संघाच्या या निर्णायविषयी बोलताना उस्मान ख्वाजा मात्र जराही नाराज दिसला नाही. तो म्हणाला, “मला माझ्या नावापुढे द्विशतक लावाचये आहे, पण हीच क्रिकेटची खासियत आहे. तुम्हाला अचे विक्रम आणि लक्ष्य गाठायचे असतात, पण सामना जिंकणेही गरजेचे आहे. त्यामुळे सर्वात आधी संघासाठी विचार करणे गरजेचे आहे. मला वाटते कोणीही पाहू शकते की, ऑस्ट्रेलिया संघ त्यांचे सामने कसे खेळतो. नेहमी संघ सर्वात आधी असतो. माझ्या मते ही गोष्टी सर्वात महत्वाची असते.”
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्याच्या एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियान दक्षिण आफ्रिका संघाला फॉलोऑन दिला, मात्र तरीही सामना निकाली निघाला नाही. ऑस्ट्रेलियाने दिलेले 476 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेला आफ्रिकी संघ पहिल्या डावात 255 धावांवर गुंडाळला गेला. नंतर ऑस्ट्रेलियाने त्यांना ऑलोऑन दिला. शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आफ्रिकी संघाने 2 बाद 106 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारच्या वादळी शतकामागे आहे ‘हे’ कारण, टी-20 मालिका जिंकल्यानंतर केला खुलासा
क्रिकेटमध्ये पुन्हा पवार पर्व! रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष