---Advertisement---

उस्मान ख्वाजाने जिंकला 2023 ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार, ‘हा’ भारतीयही होता शर्यतीत

On: गुरूवार, जानेवारी 25, 2024 5:09 PM
Usman Khawaja
---Advertisement---

ICC Test Cricketer of the Year: आयसीसीचे मानाचे मानले जाणारे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारांची आयसीसीने नुकतीच घोषणा केली आहे. त्यातील ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर‘ या मानाच्या पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज उस्मान ख्वाजा याने जिंकला आहे.

आयसीसीने २०२३ मधील सर्वोत्तम कसोटी फलंदाजासाठी या वर्षात चांगली फलंदाजी करणाऱ्या ४ फलंदाजांची निवड केली होती. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रेविस हेड, भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन, इंग्लंडचा फलंदाज जो रूट आणि ऑस्ट्रलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा यांची निवड करण्यात आली होती. परंतु या तिघांना मागे टाकत उस्मान ख्वाजा याने या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

उस्मान ख्वाजाने २०२३ या वर्षात एकूण १३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने १२१० धावा केल्या आहेत. नाबाद १९५ ही त्याची या दरम्यानची सर्वोत्तम खेळी आहे. तर आर अश्विन याने ७ कसोटी सामन्यात ४१ विकेट्स घेतल्या होत्या. ट्रेविस हेड याने १२ सामन्यात ९१९धावा केल्या आहेत, तरजो रूट याने ८ सामन्यात ७८७ धावा केल्या आहेत आणि यादरम्यान त्याने ८ विकेट्सही घेतल्या आहेत. (Usman Khawaja wins 2023 ICC Test Cricketer of the Year this Indian too in the running)

हेही वाचा

लाईव्ह सामन्यात घुसला विराटचा चाहता, घेतला रोहित शर्माचा आशिर्वाद, पाहा VIDEO
‘एवढं सगळं करुन काय उपयोग झाला?’, हतबल रोहित शर्माने केले मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---