---Advertisement---

David Warner । उस्मान ख्वाजाची आई करते वॉर्नरचा ‘सैतान’ म्हणून उल्लेख, सलामीवीर फलंदाजानेच सांगितले कारण

On: शनिवार, जानेवारी 6, 2024 6:30 PM
David Warner with Usman Khawaja's Mom
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर शनिवारी (6 जानेवारी) आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर वॉर्नर या फॅरमॅटमधून निवृत्त होत आहे. शेवटच्या सामन्यात त्याला शुभेच्छा आणि निरोप देण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यात उस्मान ख्वाजा याची आईदेखील होती. ख्वाजाने आपली आई आणि वॉर्नर यांच्यातील नात्याविषयी खास प्रतिक्रिया दिली.

डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक राहिला आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली. वॉर्नरने आधी घोषित केल्याप्रमाणे सिडनी कसोटी संपल्यानंतर तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. तसेच वनडे क्रिकेटमधूनही काही दिवसांपूर्वीच निवृत्ततीची घोषणा त्याने केली होती. आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात वॉर्नरने पहिल्या डावात 34, तर दुसऱ्या डावात 57 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 8 विकेट्सने जिंकला आणि मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला.

डेव्हिड वॉर्नर () आणि उस्मान ख्वाजा () अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून खेळत आले आहेत. दोघे वयाच्या सहाव्या वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत. याच कारणास्तव वॉर्नर आणि ख्वाजा कुटुंब एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखते. ख्वाजाची आई वॉर्नरला अगदी आपल्या मुलाप्रमाणे मानत असल्याचे अनेकदा बोलले गेले आहे. आता स्वतः ख्वाजानेच याविषयी खास प्रतिक्रिया दिली. ख्वाजाने सांगितल्याप्रमाणे त्याची आई वॉर्नरला ‘सैतान’ या नावाने बोलावते.

वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ख्वाजा म्हणाला, “माझी आई वॉर्नरला तेव्हापासून ओळखते, जेव्हापासून मी त्याला ओळखतो. आईचे त्याच्यावर प्रेम आहे. ती त्याला प्रेमाणे ‘सैतान’ असे बोलावते. तो सैताना आहे, हेच माझ्या आईला खूप आवडते.” दरम्यान, वॉर्नरच्या शेवटचा कसोटी सामना पाहण्यासाठी ख्वाजाची आई शनिवारी (6 जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर उफस्थित होती. सामना संपल्यानंतर वॉर्नरने त्यांची गळाभेट देखील घेतला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, वॉर्नरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल 112 कसोटी सामन्यांमध्ये 8786 धावा केल्या आहेत. यात 26 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 161 सामन्यांमध्ये 6932 धावा केल्या. यात 22 शतक आणि 33 अर्धशतकांचा समावेश होता. वॉर्नर आता ऑस्ट्रेलियासाठी यावर्षी होणारा टी-20 विश्वचषक खेळू इच्छित आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 99 सामन्यांमध्ये 2894 धावा केल्या आहेत. एक शतक आणि 24 अर्धशतकांच्या मदतीने त्याने या धावा केल्या आहेत. (Usman Khawaja’s mother calls David Warner as devil)

महत्वाच्या बातम्या – 
ICC ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईअर’साठी नामांकने जाहीर, ‘हा’ भारतीय खेळाडूही आहे दावेदार
AUS vs PAK । पाकिस्तान संघाचे विराटच्या पावलावर पाऊल! शेवटच्या कसोटीत वॉर्नरला खास भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---