इंदोर येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात भारतीय संघाला रोखत विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. आता तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी 76 धावांचे आव्हान असेल. मात्र, सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नेण्यात उस्मान ख्वाजा (Usman Khwaja Catch) याचा एक झेल निर्णायक ठरला.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 88 धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतीय संघाला ही आघाडी भरून काढत मोठी आघाडी मिळवावी लागणार होती. मात्र, ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याच्या पुढे भारताचे प्रमुख चार फलंदाज 78 धावांवर तंबूत परतले होते. तर एका बाजूने चेतेश्वर पुजारा संघर्ष करताना दिसत होता. चहापानानंतर श्रेयस अय्यरने आक्रमण करत 27 चेंडूवर 26 धावा केल्या. अय्यर आपल्या आक्रमक खेळाने तो भारताला मोठी आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न करत होता.
https://twitter.com/RanDHwa17/status/1631249888674471936?t=h0PlMGHvspYHCYxoZAYGug&s=19
भारताची आघाडी 25 धावांची झाली असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने प्रमुख वेगवान मिचेल स्टार्क याला गोलंदाजीसाठी पाचारण केले. त्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न श्रेयसने उस्मान ख्वाजाच्या हाती झेल दिला. त्याने आपल्या डाव्या हातावर झेप मारत एक शानदार झेल पूर्ण केला. त्या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 88 धावांच्या आघाडीनंतर भारताचा दुसरा डाव केवळ 163 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासाठी नॅथन लायन याने सर्वाधिक 8 बळी टिपले. तर, भारतासाठी चेतेश्वर पुजाराने 59 धावांची खेळी केली. फलंदाजीसाठी अत्यंत अवघड होत असलेल्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे विजयी लक्ष पार करावे लागेल.
(Usman Khwaja Takes Stunner Of Shreyas Iyer In Indore Test Turning Point Of Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी…’, फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा
वडिलांना गमावल्यानंतर खचला नाही उमेश, पुनरागमन करताच गाठली बळींची ‘शंभरी’, आता लक्ष्य नव्या रेकॉर्डवर





