उत्तराखंड राज्यातील चामोली जिल्ह्यात रविवारी (०७ फेब्रुवारी) अतिशय भयावह घटना घडली. या जिल्ह्यातील रेणी गावातील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर (हिमकडा) कोसळले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने चामोलीपासून ते हरिद्वारपर्यंतची कित्येक घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेबद्दल रिषभ पंतने दुख: व्यक्त केले आहे.
रिषभने त्याचे दु:ख ट्विटरवर व्यक्त करताना दुर्घटनाग्रस्तांना मदत करणाऱ्यांसाठी आपले सामना शुक्ल दान करण्याची घोषणा केली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की “उत्तरखंडातील जीवितहानीमूळे मला खूप दुःख झाले आहे. मी आपली मॅच फी या बचावकार्यासाठी देऊ इच्छितो, आणि इतरांनी देखील मदत करावे असे आवाहन मी करतो.”
रिषभ पंत हा मूळतः उत्तराखंड येथे राहणारा असून त्याचा जन्म उत्तराखंडमधील रूडकी येथे झाला आहे.
Deeply pained by the loss of life in Uttarakhand. Would like to donate my match fee for the rescue efforts and would urge more people to help out.
— Rishabh Pant (@RishabhPant17) February 7, 2021
उत्तराखंड येथील चामोली जिल्ह्यातील नीती खोऱ्यात हिमकडा कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली असून हिमकडा कोसळल्यामुळे तपोवन बैराज परिसर पूर्णतः उद्ध्वस्त झाला आणि धौली नदीला महापूर आला आहे. येथील तपोवन परिसरात बोगद्यामध्ये अडकलेल्या १६ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आयटीबीपीच्या जवानांना यश आले आहे असून याठिकाणी आणखी लोक अडकल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली होती.
माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांनी देखील या घटनेबद्दल ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आणि सर्वांनी सुरक्षित राहावे यासाठी देखील प्रार्थना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेमध्ये जीव गमावलेल्या कुटुंबियांसाठी दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनीही मृतांच्या कुटुंबातील लोकांना चार लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
उत्तराखंडमधील पौडी, टिहरी, रुद्राप्रयाग, हरिद्वार आणि डेहराडून यासह अनेक जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला आहे. भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलातील प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तपोवन परिसरात सुरु असलेल्या एका प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी दीडशेहून अधिक मजुरांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे तर आतापर्यंत आयटीबिपीच्या जवानांनी १० च्या वर मृतदेह काढले असून १६ लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराट कोहलीची विकेट माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण”
भन्नाट कॅच! स्टोक्सने घेतला जसप्रीत बुमराहचा घेतला अफलातून एकहाती झेल, पाहा व्हिडिओ
घरासोबत वासेही फिरले! ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यष्टिरक्षण सोडून चक्क करतोय गोलंदाजी, पाहा व्हिडिओ