---Advertisement---

CSK vs KKR: ‘हा’ ठरला चेन्नईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट

On: गुरूवार, मे 8, 2025 12:35 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 57 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 7 मे रोजी खेळण्यात आला. ह्या सामन्यात चेन्नईने केकेआरचा 2 विकेट्सने पराभव करत सामना जिंकला. त्यामुळे केकेआर प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.

केकेआरने दिलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली. चेन्नईचे दोन्ही सलामीवीर आयुष म्हात्रे आणि डेव्हॉन कॉन्वे डकवर बाद झाले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या उर्विल पटेलने वादळी सुरूवात केली. उर्विल पटेल 11 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांसह 31 धावा करत बाद झाला. याशिवाय डेवाल्ड ब्रेविसने पहिलं अर्धशतक झळकावत शानदार खेळी केली. ब्रेविसने वैभव अरोराच्या एका षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत 30 धावा लुटल्या आणि यासह ब्रेविसने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 52 धावांची खेळी केली. याक्षणी सामना फिरला आणि चेन्नईचा विजय निश्चित झाला.

ब्रेविसनंतर धोनी आणि शिवम दुबेने 43 धावांची सावध भागीदारी करत संघाला विजय मिळवून देण्यात भूमिका बजावली. शिवम दुबेचे अर्धशतक हुकले असले तरी त्याने 40 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 45 धावा केल्या. तर धोनीने एका षटकारासह 17 धावांची खेळी केली. तर अंशुल कंबोजने 1 चौकारासह संघाला दोन चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवून दिला. केकेआरकडून वैभव अरोराने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले पण त्याची सर्वाधिक धुलाई चेन्नईच्या फलंदाजांनी केली. याशिवाय हर्षित राणा आणि चक्रवर्तीने 2-2 विकेट तर मोईन अलीने 1 विकेट घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---