भारत अंडर-19 आणि दक्षिण आफ्रिका अंडर-19 (under 19 IND vs SA) यांच्यातील दुसऱ्या वन-डे सामन्यात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) चौफेर फटकेबाजी करत शानदार अर्धशतक झळकावले.
वैभवने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 8 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याने हा टप्पा गाठला. अर्धशतक पूर्ण करेपर्यंत त्याने एकूण 8 षटकार लगावले होते. म्हणजेच 51 पैकी 48 धावा त्याने केवळ षटकारांच्या मदतीने केल्या.
डावाच्या पहिल्याच षटकामध्ये त्याने 2 षटकार मारून इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या, पाचव्या आणि सहाव्या षटकामध्येही त्याने षटकारांची आतषबाजी सुरूच ठेवली. 6 षटकांनंतर तो 18 चेंडूत 45 धावांवर खेळत होता.
पन्नास धावा पूर्ण झाल्यावर त्याने पुढच्या दोन चेंडूंवर सलग 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर या खेळीतील आपला पहिला चौकार मारला. वैभव 9 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्याने एकूण 24 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली, ज्यामध्ये 10 षटकार आणि 1 चौकार सामील होता.






