---Advertisement---

वरुण चक्रवर्तीने अश्विन आणि बिश्नोईचा विक्रम मोडला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

On: बुधवार, जानेवारी 29, 2025 12:30 PM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेत भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती धुमाकूळ घालत आहे. त्याने तीन सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मंगळवारी (28 जानेवारी) राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडकडे वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीचा उत्तर नव्हता. त्याने पहिल्या दोन सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात पुन्हा एकदा त्याने शानदार गोलंदाजी केली. आपल्या फिरकीने इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. या दरम्यान त्याने आर अश्विन आणि रवी बिश्नोई यांचा एक मोठा विक्रमही मोडला.

भारतातील द्विपक्षीय टी20 मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने केला आहे. राजकोट टी20 सामन्यात वरुण चक्रवर्तीने जोफ्रा आर्चरला बाद करताच, त्याने दुसऱ्यांदा पाच बळी घेतले. यासह तो एका मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि लेग स्पिनर रवी बिश्नोई यांचा विक्रम मोडला.

कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या. तर चेन्नई येथे झालेल्या सामन्यात त्याला 2 विकेट्स मिळाल्या. तसेच त्याला राजकोटमध्ये पाच विकेट्स मिळाले आणि अशा प्रकारे त्याच्या नावावर 10 विकेट नोंदल्या गेल्या. यापूर्वी, आर अश्विनने 2016 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या द्विपक्षीय टी20 मालिकेत भारताकडून 9 विकेट्स घेतल्या होत्या. 2023 मध्ये रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतक्याच विकेट्स घेतल्या होत्या.

वरुण चक्रवर्ताीने या दोन्ही गोलंदाजांना मागे टाकले आहे. मात्र, वरुण चक्रवर्तीच्या पाच विकेट्स कामी आल्या नाहीत आणि संघाला 26 धावांनी पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत अजूनही 2-1 ने आघाडीवर आहे. परंतु इंग्लंडने मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

हेही वाचा-

14 महिन्यांनी मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला, अशी होती कामगिरी
भारतीय खेळाडूंचा ICC पुरस्कारांमध्ये डंका, बुमारहच्या खात्यात दोन, तर…
IND vs ENG: राजकोटमध्ये टीम इंडियाचा पराभव, कर्णधार सूर्या म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---