रविवारी (२६ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये रंगला होता. या सामन्यात चेन्नई संघाने शेवटच्या चेंडूवर २ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान निर्णायक क्षणी वरुण चक्रवर्तीने एमएस धोनीला बाद करत कोलकाता संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते.
चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ- मोठे विक्रम केले आहेत. तसेच अनेक दिग्गज गोलंदाजांना त्याने अडचणीत देखील टाकले आहे. परंतु कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने एमएस धोनीला एकदा दोनदा नव्हे, तर तब्बल ३ वेळेस बाद केले आहे. तो एकमेव गोलंदाज आहे, ज्याने धोनीला आयपीएल स्पर्धेत ३ वेळेस बाद केले आहे.
Varun Chakravarthy getting MS Dhoni for the 3rd time in four innings in IPL.
— Johns. (@CricCrazyJohns) September 26, 2021
झाले असे की, चेन्नई सुपर किंग्स संघाला या सामन्यात विजयासाठी १७२ धावांची आवश्यकता होती. जेव्हा धोनी फलंदाजीला आला त्यावेळी संघाला विजयासाठी ३० धावांची आवश्यकता होती. त्यावेळी वरुण चक्रवर्तीने अप्रतिम गुगली चेंडू टाकला, जो धोनीच्या बॅट आणि पॅडच्या मधून यष्टीला जाऊन धडकला. यासह वरुण चक्रवर्तीने आयपीएल स्पर्धेत तिसऱ्यांदा एमएस धोनीला बाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तसेच हे दोघेही तीन वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान वरुण चक्रवर्तीने १२ चेंडूंमध्ये अवघ्या १० धावा खर्च करत ३ वेळेस त्याला बाद केले आहे. मुख्य बाब म्हणजे तिन्ही वेळेस त्याने धोनीला त्रिफळाचीत केले आहे.
Dhoni vs Varun
Three innings
12 balls
10 runs
Three dismissals – all bowled#IPL2021 #CSKvKKR— Cricbuzz (@cricbuzz) September 26, 2021
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला २० षटकाअखेर ६ बाद १७१ धावा करण्यात यश आले होते. यामध्ये राहुल त्रिपाठीने ४५, तर नितीश राणाने नाबाद ३७ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना, चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली, तर ऋतुराज गायकवाडने ४० आणि मोईन अलीने ३२ धावांचे योगदान दिले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने २ गडी राखून विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून देण्यात मुंबई सरस की चेन्नई भारी? वाचा थोडक्यात
-भावनेच्या भरात वाहून गेला व्यंकटेश अय्यर; आऊट झाल्यानंतरही लावली डीआरएसची वाट
-CSKvsKKR: जडेजाच्या धुव्वादार खेळीने केकेआरच्या तोंडून हिसकावला सामना, सीएसकेचा २ विकेट्सने विजय






