भारत आणि इंग्लंड संघादरम्यान चेन्नई येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. चेन्नईचे मैदान हे अनेक रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मैदानावर भारत आणि इंग्लंड संघामध्येच एक मोठा वाद निर्माण झाला होता. १९७६-७७ सालच्या मालिकेत भारतीय कर्णधार बिशन सिंग बेदी यांनी विरोधी गोलंदाज जॉन लीवरवर चेंडूवर व्हॅसलिन लावण्याचा खळबळजनक आरोप केला होता.
चेन्नई कसोटीत निर्माण झाला वाद
१९७६-७७ साली इंग्लंडचा क्रिकेट संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. यावेळी इंग्लिश गोलंदाज लीवरची स्विंग गोलंदाजी भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत होती. दिल्ली येथील सामन्यात त्याने कसोटी कारकीर्दीची सुरुवात 10 गडी बाद करून केली. यानंतर कोलकाताच्या दुसर्या कसोटी सामन्यात देखील लीवरने शानदार कामगिरी केली.
चेन्नई येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील लीवरने 7 गडी बाद करत इंग्लंडला सामना जिंकून दिला. मात्र या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार बिशन सिंग बेदी यांनी लीवरवर चेंडूवर व्हॅसलिन लावत असल्याचा आरोप केला. यावर अंपायरने लीवरकडे स्पष्टीकरण मागितले.
लीवरने सांगितले की तो घाम थांबवण्यासाठी भुवयांना व्हॅसलिन लावत आहे. बेदी यांचा आरोप होता की लीवर सत्य लपवत आहे. व्हॅसलिनच्या माध्यमातून तो चेंडू चमकवत आहे आणि त्यामुळे चेंडू स्विंग करतो आहे. बॉलमधील अतिरिक्त चमक स्विंगसाठी उपयुक्त आहे. लीवर याने मात्र हे सर्व आरोप नाकारले.
त्याकाळात इंग्लंड संघाचा जागतिक क्रिकेटवर दबदबा असल्यामुळे हे प्रकरण बेदींच्याच अंगलट आले. बेदींना काउंटी क्रिकेट मध्ये खेळण्यापासून रोखले गेले. हे प्रकरण तेव्हा संपुष्टात आले. मात्र या सामन्याला आजही लोक ‘व्हॅसलिन कसोटी’ म्हणूनच ओळखतात.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ : सामना चालू असतांना भर मैदानात आली मांजर, मग नंतर घडले असे काही
दानशूर रिषभ पंत! उत्तराखंड दुर्घटनेतील बचावकार्यासाठी केला मदतीचा एक हात पुढे
भन्नाट कॅच! स्टोक्सने घेतला जसप्रीत बुमराहचा घेतला अफलातून एकहाती झेल, पाहा व्हिडिओ