भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला पराभूत करत कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. यात आर. अश्विन याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीचा मोलाचा वाटा आहे. अश्विनने दुसऱ्या डावात शतक झळकावले आणि सामन्यात ८ गडी देखील बाद केले. तसेच या सामन्यात यष्टीच्या मागे उत्कृष्ट कामगिरी करत रिषभ पंत यानेदेखील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पंतने दोन झेल टिपले तसेच २ फलंदाजांना यष्टीचीत देखील केले. यानंतर त्याच्या यष्टीरक्षणाबद्दल माजी इंग्लिश कर्णधाराने वक्तव्य केले आहे.
इंग्लंड संघाचे पूर्व कर्णधार माईकल वॉन यांनी रिषभ पंत याच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील यष्टी मागे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वक्तव्य करताना म्हटले आहे की, ” खरं सांगू तर, भारतीय संघासाठी सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट होती ती म्हणजे रिषभ पंतचे यष्टिरक्षण. मला वाटते की भारतीय संघासाठी हाच मोठा प्रश्न होता की, तो खूप वेळ भारतीय संघासोबत टिकून राहील का? जर तुमचा यष्टिरक्षक झेल सोडत असेल तर तुम्ही सर्वोत्तम नाही बनून राहू शकत. हे तथ्य आहे. तुम्हाला चांगला यष्टिरक्षक बनावच लागेल. तुम्हाला चेंडू पकडावा लागेल, यष्टीचीत करावं लागेल.”
उत्तम यष्टिरक्षक होण्यासाठी त्याला अजून सराव करावा लागेल – माइकल वॉन
दुसऱ्या कसोटी सामन्यात याष्टिमागे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिषभ पंत याला वॉन यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “मला वाटत आहे की, तो खूप अभ्यास करतोय आणि सरावदेखील करतोय, त्याला खूप पुढे जायचं आहे. उत्तम यष्टिरक्षक होण्यासाठी त्याला अजून खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. यष्टीच्या मागे एक कसोटी सामना तुम्हाला उत्तम यष्टिरक्षक बनवू शकत नाही. त्याला हे पुन्हा पुन्हा करावं लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलाव: ‘हे’ पाच परदेशी खेळाडू बनू शकतात करोडपती, एक तर होतोय प्रथमच सहभागी
आयपीएल लिलाव २०२१ : कधी आणि कुठे होणार लिलाव, कोणकडे आहेत सर्वाधिक पैसे? जाणून घ्या सर्वकाही
आयपीएल लिलाव : १४ व्या हंगामासाठी ‘या’ खेळाडूंना संघात सामील करु शकतो बेंगलोर संघ