भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या मागच्या वर्षा जेव्हा दुखापतीशी झगडत होता, तेव्हा त्याची जागा घेण्यासाठी एक नाव सर्वाधिक चर्चेत होते. ते नाव म्हणजे वेंकटेश अय्यर. त्याने आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करून भारतीय संघात जागा मिळवली, पण फार काळ टिकवून मात्र ठेवू शकला नाही. माकच्या काही महिन्यांपासून वेंकटेशचे नाव भारतीय संघातून गायब आहे, पण त्याने पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.
वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) सध्या सय्यर मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशसाठी खेळत आहे. राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने फलंदाज आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये संघासाठी महत्वपूर्ण जबरदस्त प्रदर्शन केले आहे. मध्य प्रदेशने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्सच्या नुकसानावर 173 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघ 135 धावांवर गुंडाळला गेला.
वेंकटेशने सुरुवातीला राजस्थान संघाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने अवघ्या 31 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिली. मध्य प्रदेश संघासाठी वेकंटेशव्यतिरिक्त चंचल राठोरने 33, कुलदीप घेहीने 31, शुभम शर्मा याने 32 धावांचे योगदान दिले.
राजस्तानला विजायासाठी 174 धावांचे लक्ष्य मिळाले होते. गोलंदाजी करताना वेंकटेशने त्यांची वरची आणि मधली फळी उध्वस्त केली. वेंकटेसने टाकलेल्या चार षटकांमध्ये 20 धावा दिल्या आणि सहा विकेट्स घेतल्या. त्याने संघासाठी सातव्या गोलंदाजाच्या रूपात हे प्रदर्शन केले आहे. राजस्थानसाठी सर्वात जास्त 44 धावा सलमान खान याने केल्या. सलमानची विकेट देखील वेंकटेशनेच घेतली. त्याने सलामीवीर यश कोठारी याला तंबू धाडले, ज्याने 36 धावाची खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.
वेंकटेशच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थान संघ लक्ष्य गाठू शकला नाही. वेंकटेशव्यतिरिक्त पुनीत दाते, अश्विन दास, कमाल त्रिपाठी, कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. दरम्यान, वेंकटेश सध्या जरी भारतीय संघातून बाहेर असला, तरी त्याने भारतासाठी काही महत्वाचे सामने नक्कीच खेळले आहेत. भारतासाठी त्याने दोन एकदिवसय आणि नऊ टी-20 सामने खेळले आहेत. टी-20 सामन्यांमध्ये त्याने 133 धावा केल्या, तर गोलंदाजाच्या रूपात 5 विकेट्स घेतल्या. एखदिवसीय सामन्यांमध्ये त्याने फलंदाजाच्या रूपात 24 धावा केल्या, तर गोलंदाजाच्या रूपात त्याच्या हाती एकही यश आले नाही. असे असले तरी, मुश्ताक अली ट्रॉफीतील या सामन्यातप्रमाणे तो प्रदर्शन करत राहिली, तर नक्कीच भविष्यात पुन्हा एकदा भारतीय संघात त्याला संधी मिळेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ते पुन्हा आलेत! मालिका जिंकताच गब्बर सेनेचा ‘बोलो तारारारा’; पाहा भारी व्हिडिओ
मुश्ताक अली ट्रॉफी: पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राचा 99 धावांनी लाजिरवाणा पराभव; पडिक्कलचे झंझावाती शतक