---Advertisement---

करियरमधील १०० टक्के सामने सचिनसोबत खेळलेला हा होता एकमेव क्रिकेटपटू

On: शनिवार, एप्रिल 25, 2020 4:29 PM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक क्रिकेटपटूंबरोबर क्रिकेट खेळला. संघसहकारी आणि प्रतिस्पर्धी खेळाडू मिळून तो कसोटीत ६०२ खेळाडूंबरोबर तर वनडेमध्ये ८६६ खेळाडूंबरोबर खेळला आहे.

या खेळाडूंपैकी कारकिर्दीत वनडे आणि कसोटीमध्ये प्रत्येकी कमीत कमी २५ सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये १ असा खेळाडू आहे ज्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्व सामने सचिन तेंडुलकरबरोबर खेळले आहेत. तो खेळाडू म्हणजे वेंकटपथी राजू.

फेब्रुवारी १९९० मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वेंकटपथी राजू यांनी त्यांच्या कारकिर्दीत २८ कसोटी आणि ५३ वनडे सामने खेळले. विशेष म्हणजे त्यांंनी खेळलेल्या या सर्व सामन्यात सचिन तेंडुलकरही भारतीय संघाचा भाग होता. Venkatapathy Raju is played ALL of his Tests and ODIs with Sachin Tendulkar

वेंकटपथी राजू यांनी कसोटीत ९३ विकेट्स तर वनडेत ६३ विकेट्स घेतल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग -४ सिंहासनाकडे वाटचाल…

टीम इंडियाचा पहिला व शंभरावा टी२० सामना खेळणारे दोन दिग्गज खेळाडू

टीम इंडियाचा पहिला व शंभरावा टी२० सामना खेळणारे दोन दिग्गज खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---