कोलकाता नाइट रायडर्स संघाला आपल्या दूसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या ६ व्या सामन्यात फाफ डु प्लेसीसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी)ने केकेआरला ३ विकेट्सने पराभूत केले आहे. आरसीबीने आयपीएल २०२२चा हा दुसरा सामना जिंकत आपले विजयाचे खाते खोलले आहे. पराभवानंतर देखील कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या संघातील खेळाडूंचे कौतुक केले आहे. तसेच श्रेयसने १९ वे षटक व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) दिले होते, जे डावातील निर्णायक षटक होते. आता त्याने यामागचे कारण देखील सांगितले आहे.
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, “मला खरोखर हा खेळ रोमांचक वाटला. मी मैदानात उतरण्यापूर्वी संघातील खेळाडूंशी चर्चा केली होती, तेव्हा त्यांनी सांगितले की हा सामना मैदानात आपले चरित्र आणि वृत्ती परिभाषीत करणार आहे, जरी आपण छोट्या लक्ष्याचा बचाव करु शकलो किंवा नाही तरी. ज्या पद्धतीने आम्ही खेळ खेळला, तो पुढील काही सामन्यांत आमची मानसिकता दाखवेल. ज्या पद्धतीने आम्ही सामना खेळलो आणि तो शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेलो, मला यावर गर्व आहे.”
तो पुढे म्हणाला की, “शेवटचे षटक मी व्यंकीला दिले, कारण त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजी करण्याचा खूप अनुभव आहे. तुम्हाला स्पर्धेच्या सुरुवातीला त्याचे समर्थन करण्याची गरज आहे. हे खरेच महत्त्वाचे आहे कि त्याने लवकरात लवकर आत्मविश्वास साध्य केला पाहिजे.”
श्रेयस अय्यरने शेवटच्या षटकात व्यंकटेश अय्यरला चेंडू दिला. बॅंगलोरला विजयासाठी १२ चेंडूत १७ धावांची गरज होती. व्यंकटेश अय्यरने या षटकात १० धावा दिल्या, ज्यामध्ये हर्षल पटेलच्या २ चौकारांचा समावेश आहे. शेवटच्या षटकात विजयासाठी ७ धावांची गरज होती आणि दिनेश कार्तिकने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला आणि दूसऱ्या चेंडूवर चौकार लगावत सामना जिंकवला.
डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाता संघ १८.५ षटकात १२८ धावांवर सर्वबाद झाला. हे लक्ष्य आरसीबीने ७ विकेट्स गमावत १९.२ षटकातच गाठले. २० धावा देत ४ विकेट्स घेणारा आरसीबीचा फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगाला (Wanindu Hasaranga) या सामन्याचा सामनावीर म्हणून गोरवण्यात आले. आरसीबीकडून सर्वाधिक २८ धावा शेरफन रदरफोर्ड याने केल्या. दिनेश कार्तिकने ७ चेंडूत १४ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
गोंधळच गोंधळ! आरसीबीचे दोन्ही फलंदाज एकाच बाजूला धावले, तरीही बाद नाही झाले- Video
रहाणेच्या मोठ्या विक्रमावर सिराजने फेरले पाणी; धोनी, विराटच्या क्लबमध्ये सामील होण्याची होती संधी
जंटलमन हॅश- दारुच्या ब्रँडचा लोगो जर्सीवर न लावल्यामुळे लाखो रुपये गमावलेल्या हशिम आमलाची गोष्ट