---Advertisement---

IPL 2025: KKRच्या कर्णधारपदासाठी स्टार खेळाडू सज्ज! म्हणाला…

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2025 8:56 PM
Venkatesh-Iyer
---Advertisement---

आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होईल. त्यासाठी सर्व संघ सज्ज आहेत. या स्पर्धेत 10 संघ खेळताना दिसतील. यातील काही संघांनी आपले कर्णधारांची घोषणा देखील केली आहे. पण काही संघांनी अद्याप आपल्या कर्णधाराची घोषणा केली नाही. तत्पूर्वी या हंगामाच्या शुभारंभ सामन्यातच गतविजेता कोलकाताचा संघ बंगळुरूशी भिडणार आहे, पण केकेआरने अद्याप आपल्या कर्णधाराची घोषणा केली नाही. या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया की केकेआरच्या कर्णधारपदाबद्दल व्यंकटेश अय्यर काय म्हणाला?

आरसीबीने रजत पाटीदारला (Rajat Patidar) संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे, तर केकेआरने अद्याप आपला कर्णधार निवडलेला नाही. दरम्यान, केकेआरचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरने म्हटले आहे की, जर त्याला आयपीएल 2025 मध्ये संधी मिळाली तर तो कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चे नेतृत्व करण्यास सज्ज आहे.

व्यंकटेशला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कोणत्याही स्तरावर कर्णधारपदाचा अनुभव नाही. शेवटच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली केकेआरने विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. पण 2025च्या आयपीएलसाठी झालेल्या मेगा लिलावात (Mega Auction) पंजाब किंग्जने (Punjab Kings) त्याला विकत घेतले आणि नंतर त्याची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली.

व्यंकटेशने ईएसपीएनक्रिकइंफोशी बोलताना सांगितले की, “अर्थातच, मी तयार आहे, मी नेहमीच म्हटले आहे की कर्णधारपद हा फक्त एक शिक्का आहे, मी नेतृत्वावर विश्वास ठेवतो. नेता असणे, ही एक मोठी भूमिका आहे. याबद्दल कोणतीही संदिग्धता नाही, जर मला संधी मिळाली तर मी ते नक्कीच करेन, ते न करण्याचे कोणतेही कारण नाही.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “कर्णधाराने एक चांगला आदर्श बनून एक आदर्श निर्माण केला पाहिजे. तुमच्या ड्रेसिंग रूममध्ये नेता होण्यासाठी तुम्हाला कर्णधाराचा टॅग आवश्यक नाही, तुम्हाला एक उदाहरण मांडावे लागेल, तुम्हाला मैदानावर आणि मैदानाबाहेर एक चांगला आदर्श असण्याची आवश्यकता आहे जे मी सध्या मध्य प्रदेशात करत आहे.”

तो म्हणाला, “मी मध्य प्रदेश संघाचा कर्णधार नाही पण माझ्या मताचा आदर केला जातो आणि मला अशा वातावरणात राहायला आवडते जिथे प्रत्येक व्यक्ती नवीन असो वा अनुभवी, 20 लाख रुपये, 20 कोटी रुपये, काहीही असो तुम्हाला तुमचे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. तुम्हाला फक्त मते आणि सूचना देण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि ते योग्य भावनेने घेतले पाहिजेत.”

महत्त्वाच्या बातम्या-

सामना रद्द, आता दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी कसा ठरेल पात्र ?
“दुख सगळ्यांनाच आहे, पण आम्ही चॅम्पियन!” – रिजवानचा व्हिडिओ चर्चेत
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द; ग्रुप बी मध्ये चुरस वाढली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---