22 जानेवारी 2024 या दिवसाची भारतातील प्रत्येक नागरिक वाट पाहत आहे. या दिवशी उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण देश आधीच राममय वातावरणात बुडाला आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्यासाठी अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याच्या नावाचाही समावेश आहे. अयोध्या राम मंदिराच्या अभिषेकासाठी प्रसाद यांना नुकतेच निमंत्रित करण्यात आले होते आणि ते निमंत्रण स्वीकारून ते भलतेच आनंदी दिसत होते.
व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती शेअर केली असून त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण मिळाल्याचे सांगितले आहे. आपला आनंद व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, “माझ्या हयातीत राम मंदिराचा अभिषेक व्हावा ही माझी आशा आणि अपेक्षा होती. हा मोठा क्षण आहे. 22 जानेवारीला रामलल्लाचा अभिषेक तर होणारच आहे, पण माझ्या आयुष्यातील भारताच्या सर्वात ऐतिहासिक क्षणात सहभागी होण्याचा बहुमान आणि आशीर्वादही मला मिळत आहे. आमंत्रणासाठी धन्यवाद. जय श्री राम.”
व्यंकटेश प्रसाद यांनी त्यांच्या पोस्टसोबत एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ते राम मंदिराचे निमंत्रण पत्र घेताना दिसत आहेत. या ऐतिहासिक क्षणाचा भाग झाल्याचा त्यांना किती आनंद आहे हे त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट होते.
It was a hope and a desire, that in my lifetime Ram Mandir consecration happens.
And what a moment, not only is the consecration happening on 22nd January, but have the great fortune and blessings to be able to attend India’s greatest moment in my lifetime.
Thank you for the… pic.twitter.com/Sq1bjEZUxE— Venkatesh Prasad (@venkateshprasad) January 2, 2024
वेंकटेश प्रसाद व्यतिरिक्त भारतीय संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, (Sachin Tendulkar) विराट कोहली, (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनाही अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या खास प्रसंगी क्रिकेट, बॉलीवूड, बिझनेस आणि राजकारण अशा प्रत्येक जगातील बड्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. (This Indian legend was overjoyed to be invited to Ram Mandir Prana Pratishtha said This historic moment)
हेही वाचा
शिवप्रबोधन मंडळ, ठाणे आयोजित कबड्डी स्पर्धा । होतकरू महिलांत, तर ओम् वर्तकनगर कुमार गटात विजेते
ऑस्ट्रेलियाची एक विकेट घेऊन दीप्तीचा नवा विक्रम! बनली वनडेत ‘ही’ कामगिरी करणारी चौथी भारतीय खेळाडू