---Advertisement---

टीम इंडिया क्रिकेट जगतात नवीन चोकर्स आहे का? पाहा माजी क्रिकेटपटूने काय उत्तर दिले

On: सोमवार, जानेवारी 1, 2024 9:34 AM
Indian Cricket Team
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. सेंच्युरियन कसोटी गमावून भारतीय संघाचे प्रथमच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवानंतर क्रिकेट तज्ज्ञ आणि क्रिकेट चाहते भारतीय संघावर जोरदार टीका करत आहेत.

अलीकडेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) यानेही भारतीय संघ काहीही जिंकू शकत नाही, असे म्हटले होते. सरासरी कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये त्याने भारतीय संघाचा समावेश केला. वॉनच्या या वक्तव्यानंतर भारताचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांना या विषयावर त्यांचे मत विचारले असता त्यांनी संमिश्र उत्तर दिले.

सोशल मीडियावर एका क्रिकेट चाहत्याने व्यंकटेश प्रसाद यांना विचारले की, भारतीय संघ क्रिकेट जगतात नवीन चोकर्स झाला आहे का? तर यावर हा अनुभवी गोलंदाज म्हणाला, “आम्ही चोकर नाही. आम्ही ऑस्ट्रेलियात दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. शेवटचा मालिका विजय 2021 मध्येच मिळाला होता, तोही आम्ही त्या मालिकेत 36 धावांवर ऑल आऊट झालो होतो. अर्ध्याहून अधिक खेळाडूंची अनुपस्थिती असतानाही संघाचा हा विजय खूप खास होता. पण हो, गेल्या 11 वर्षात एकही मोठी स्पर्धा न जिंकणे ही नक्कीच चिंतेची बाब आहे.”

भारतीय संघाने 2023 मध्ये दोन आयसीसी टूर्नामेंटची फायनल खेळली होती, पण दोन्हीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 2013 नंतर भारतीय संघाला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. या प्रकरणावरून संघावर सध्या टीकेची झोड उठली आहे. (Is Team India the new chokers in the cricket world See what the former cricketer replied)

हेही वाचा

ब्रेकिंग! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटप्रेमींना धक्का, डेव्हिड वॉर्नरचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
IND vs SA: माजी दिग्गजाने प्रसिध कृष्णावर दाखवला विश्वास; म्हणाला, ‘तो सेंच्युरियनपेक्षा चांगली…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---