सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने केवळ तिसऱ्याच दिवशी विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी केवळ एकाच डावात फलंदाजी केली. असे असताना आता भारतीय संघातील युवा फलंदाज शुबमन गिल याच्या जागेवर माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने आक्षेप नोंदवला आहे.
I have a lot of regard for Shubhman Gill's talent and ability, but sadly his performances have been well below par. A test average of 30 after 30 Innings in international cricket is ordinary. Can’t think of many who have been given so many chances. https://t.co/WtHrBUm4Wq
— Lucknow Supergiants (@lSgipl) July 16, 2023
गिल हा यावर्षी शानदार फॉर्ममध्ये दिसला. वर्षाच्या सुरुवातीलाच न्युझीलंडविरुद्ध वनडे व टी20 मालिकांमध्ये त्यांनी तीन शतके झळकावली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील त्याच्या बॅटमधून एक शतक आले. तसेच आयपीएलमध्ये त्याचा हा फॉर्म कायम राहिला. त्याने हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन्ही डावात व आता डॉमिनिका कसोटीत त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यामुळेच प्रसाद यांनी त्याच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करत म्हटले,
‘शुबमन गिलच्या प्रतिभा व गुणवत्तेबद्दल मला जराही शंका नाही. मात्र, कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी तितकी उजवी वाटत नाही. 30 कसोटी डावांमध्ये त्याची सरासरी देखील 30 च्या आसपास दिसून येते. इतकी संधी दुसऱ्या खेळाडूंना कदाचित मिळाली नाही.’
गिलने भारतीय संघासाठी आत्तापर्यंत 17 कसोटी सामने खेळताना 31.96 च्या सरासरीने 927 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शक्य व चार अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, मागील तीन डावांमध्ये त्याने अनुक्रमे 13, 18 व 6 धावा केल्या. विशेष म्हणजे वेस्ट इंडीजविरूद्ध त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची विनंती केल्यानंतर त्याची ही विनंती मान्य केली गेली होती.
(Venkatesh Prasad Raised Question On Shubman Gill Test Spot )
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियावर नामुष्की! प्रथमच बांगलादेशकडून स्वीकारावा लागला लाजिरवाणा पराभव
यश धूल आणि विराटमध्ये जबरदस्त बॉन्डिंग! स्वतः भारतीय कर्णधाराने केला खुलासा