भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी हा सामना संपवला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली असली तरी, संघाचा उपकर्णधार व सलामीवीर केएल राहुल हा अपयशी ठरला. त्याच्या या खराब कामगिरीवर भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने टीका केली.
राहुल सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कमालीचा अपयशी ठरत आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये देखील फारशी वेगळी त्याची कामगिरी राहिली नाही. मागील दहा कसोटी डावात तो केवळ एक अर्धशतक झळकावू शकला आहे. नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात तो संधी असताना मोठी खेळी करू शकला नाही. त्याने 71 चेंडूंचा सामना केला व केवळ 20 धावा केल्या. त्याच्या याच कामगिरीनंतर वेंकटेश प्रसाद यांनी ट्विट करत त्याच्यावर निशाणा साधला.
I have a lot of regard for KL Rahul’s talent and ability, but sadly his performances have been well below par. A test average of 34 after 46 tests and more than 8 years in international cricket is ordinary. Can’t think of many who have been given so many chances. Especially..cont
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 11, 2023
त्यांनी लिहिले,
‘मी राहुल आणि त्याच्या प्रतिभेचा खूप आदर करतो. मात्र, कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी अत्यंत साधारण आहे. आठ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून 46 सामन्यानंतर त्याची सरासरी 34 आहे. हे अत्यंत सामान्य वाटते. इतक्या संधी मिळाल्यानंतरही तो स्वतःला सिद्ध करू शकला नाही.’
त्यांनी पुढे लिहिले,
‘मागे असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या संधीची वाट पाहत आहेत. शुबमन गिल, सर्फराज खान असे अनेक क्रिकेटपटू संधीसाठी उभे दिसतात. राहुल केवळ उपकर्णधर आहे म्हणून संघात आहे का? रविचंद्रन अश्विन हा क्रिकेटच्या बाबतीत खूप हुशार वाटतो. चेतेश्वर पुजारा व रवींद्र जडेजा यांच्यामध्ये देखील ती गुणवत्ता आहे. मी तर म्हणेल मयंक अगरवाल व हनुमा विहारी त्याच्यापेक्षा जास्त प्रभाव टाकतात.’
तसेच राहुलवर टीका करत ते म्हणाले,
‘कामगिरीच्या नव्हेतर आवडीवर त्याची संघात निवड होत आहे. आठ वर्षापासून कसलेही सातत्य न दाखवता जो खेळाडू संघात राहतो, त्याच्याबाबत असेच काहीतरी असते. आयपीएलमध्ये तुमचा खेळ उंचवतो. मात्र, इथे खेळताना अशी कामगिरी होत असेल तर, पाठीशी घालणारे देखील टीका करतील.’
विशेष म्हणजे प्रसाद हे राहुल प्रतिनिधित्व करत असलेल्या कर्नाटक संघाचेच माजी खेळाडू आहेत.
(Venkatesh Prasad Slams KL Rahul On His Bad Performance)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी सध्या खूपच घाबरलेलो आहे…’, पहिल्या कसोटीत विकेट्सचा पाऊस पाडणाऱ्या अश्विनचे खळबळजनक विधान
रोहितवरच फोकस करत होता कॅमेरामन, कॅप्टनची सटकताच दिली ‘अशी’ रिऍक्शन; म्हणाला, ‘अरे ये…’