श्रीलंका क्रिकेटने बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेला माहिती दिली की, देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आगामी आशिया कप टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्याच्या स्थितीत नाही. सध्याच्या संकटामुळे श्रीलंका क्रिकेट ने अलीकडेच लंका प्रीमियर लीग (LPL) चा तिसरा हंगाम पुढे ढकलला होता.
एसीसीच्या एका सूत्राने सांगितले की, “श्रीलंका क्रिकेटने माहिती दिली आहे की त्यांच्या देशातील सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे, विशेषत: जेव्हा परकीय चलनाचा प्रश्न आहे, तेव्हा देशात सहा संघांच्या या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करणे त्यांच्यासाठी एक आदर्श परिस्थिती आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, एसएलसी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की ते यूएई किंवा इतर कोणत्याही देशात या स्पर्धेचे आयोजन करू इच्छितात.
अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी आशिया चषक ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि येत्या काही दिवसांत एसीसी याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
“यूएई हे अंतिम पर्यायी ठिकाण नाही, इतर कोणताही देश असू शकतो, भारत देखील असू शकतो कारण एसीसी आणि श्रीलंका क्रिकेटला स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी अंतिम मंजुरीसाठी प्रथम अमिराती क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्यांशी बोलणे आवश्यक आहे,” अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, सध्या भारतीय संघ आशिया कप आणि टी२० विशस्वचषकाची तयारी करत आहे. टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी संघाचा समतोल तपासून घेण्यासाठी आशिया चषक महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आशिया चषक घेणे प्राधान्याचे आहे. अशा परिस्थितीत आशिया चषकाचे विळलापत्रक बदलणे ही धोक्याची घंटा असू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पुजाराने केलंय असं काही जे कुणालाच जमलं नाही! बनलाय अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
इंग्लंडनंतर वेस्ट इंडीजचा धुव्वा उडवण्यासाठी भारतीय संघ सज्ज, पाहा प्रॅक्टिस सेशनचा खास व्हिडिओ