---Advertisement---

‘तो संघात परतल्याचा आनंद आहे’, तब्बल १५ महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या क्रिकेटरबद्दल विराटची प्रतिक्रिया

On: गुरूवार, मार्च 11, 2021 9:40 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (१२ मार्च) ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात काही युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. याबरोबरच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचेही या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे त्याबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केला आहे.

भुवनेश्वर गेले १५ महिने दुखापतीमुळे भारतीय संघातून दूर होता. पण आता तो दुखापतीतून सावरला असून भारतीय संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याने शेवटचा टी२० सामना डिसेंबर २०१९ मध्ये खेळला होता.

त्याच्या पुनरागमनाबद्दल पहिल्या टी२० सामन्याआधी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विराट म्हणाला, ‘भुवनेश्वर चांगल्याप्रकारे दुखापतीतून सावरला आहे. तो संघात परतला असून, तो तंदुरुस्त आहे.’

तसेच विराट पुढे म्हणाला, ‘त्याने पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याच्याकडे असलेला अनुभव आम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे. त्याला पुढे काय करायचे आहे, याबाबत पूर्ण स्पष्टपणे माहित आहे. येत्या काही महिन्यात भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलण्यास तो सज्ज आहे. नक्कीच टी२० विश्वचषक जवळ येत असल्याने आम्हाला आमचा सर्वाधिक अनुभवी गोलंदाज संघात हवा आहे आणि जगातील कोणत्याही गोलंदाजापेक्षा तो योग्य आहे. तो सुरुवातीच्या, मधल्या किंवा शेवटच्या षटकांसाठी योग्य आहे.’

त्याचबरोबर विराट म्हणाला, ‘तो असा खेळाडू आहे, ज्यावर तुम्ही विश्वास टाकू शकता आणि मला आनंद आहे की तो परत आला आहे. मला आशा आहे की तो इथून पुढे चांगली कामगिरी करेल आणि तो विश्वचषकासाठी तयार असेल.’

टी२० विश्वचषक यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत भारतात होणार आहे. या विश्वचषकासाठी विजयाचा प्रबळ दावेदार भारत आहे का असे विचारले असता विराच म्हणाला, इंग्लंडला टी२० विश्वचषकात पराभूत करत कठीण असेल कारण ते सध्या अव्वल क्रमांकाचा संघ आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड संघातील ५ सामन्यांची टी२० मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हे सामने अनुक्रमे १२, १४, १६, १८ आणि २० मार्च रोजी होणार असून या मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

शिखर धवन की केएल राहुल, कोणाबरोबर करणार सलामीला फलंदाजी? रोहित शर्माने दिले ‘हे’ उत्तर

‘असे’ झाले तर विराटची टीम इंडिया बनू शकते क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील अव्वल संघ

विजय हजारे ट्रॉफी: पृथ्वी शॉच्या मुंबई संघाचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; उत्तर प्रदेशविरुद्ध रंगणार अंतिम मुकाबला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---