भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकत इतिहास घडवला. तीन सामन्यांच्या या मालिकेत त्यांनी यजमानांना 3-0 अशी धूळ चारली. शनिवारी (24 सप्टेंबर) खेळला गेलेला हा सामना भारताने 16 धावांनी जिंंकला. भारताचा हा महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. मात्र या मालिकेतील हा शेवटचा सामना दीप्ति शर्मा हीच्या विवादास्पद धावबादने लक्षात राहिला आहे. यामध्ये आता दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरण यांनी उडी घेतली आहे.
लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताची फिरकीपटू दीप्ति शर्मा (Deepti Sharma) हिने उत्तम गोलंदाजी केली. तिने चार्लोट डीन हिला धावबाद करत संघाला विजय मिळवून दिला. तिने मंकडींग पद्धतीने फलंदाजाला बाद केले. तिच्या या कृतीने इंग्लंडच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर अनेकांनी दीप्तिचे समर्थन केले आहे तर काहींनी तिला चुकीचे म्हटले आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने तिची बाजू घेतली आहे. हरमनप्रीतने सामन्यानंतर बोलताना म्हटले की दीप्तिने नियमांच्या विरुद्ध जाऊन कोणचीही चूक केलेली नाही.
भारताचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) यानेही दीप्तिचे समर्थन केले आहे. त्याने आयपीएलमध्ये इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर याला अशाच पद्धतीने बाद केले होते. त्यानेही दीप्तिच्या प्रेजेंस ऑफ माइंडचे कौतुक केले आहे. त्याने ट्वीट करत, धावबाद करण्याचे श्रेय गोलंदाजाला द्यावे असे म्हटले. हे त्याने मस्करीत म्हटेल असेल, मात्र क्रिकेटविश्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज मुथय्या मुरलीधरण याने निराशा दर्शवली आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना मुरलीधरणने म्हटले, “काय प्रेजेंस ऑफ माइंड कोणाताही क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यात नाही खेळणार जर त्याच्याकडे प्रेजेंस ऑफ माइंड नसेल तर. मी दीप्ति शर्माचे कौतुक करेल जेव्हा तिने नॉन-स्ट्रायकर फलंदाजाला बाद करण्यापूर्वी इशारा दिला असता तेव्हा तो खेळेच्या भावनेनुसार असते. दीप्तिने तिच्या विधानात म्हटले की मी चार्ली डीनला आणि अंपायरला देखील याची चेतावणी दिली होती. चार्ली एकदा, दोनदा नाही तर अनेकदा क्रिज सोडली आहे.”
“कायद्याचे बोलाल तर नॉन स्ट्रायकरला रनआऊट करणे योग्य आहे, मात्र खेळ भावनेच्या हे विरुद्ध आहे. मर्यादीत षटकांचा सामना हा दबाबात्मक असतो यामुळे नॉन स्ट्रायकर लवकर क्रिज सोडतो. नॉन स्ट्रायकरने अनेकदा ही कृती केली तर त्याला रनआऊट करणे बरोबर आहे,” असेही मुरलीधरणने पुढे म्हटले आहे. याचबरोबर आयसीसीचे नियम तयार करणारी मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) यांनीही या रनआउटला बरोबर म्हटले आहे.
क्रिकेटच्या नियमानुसार, नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला बाद करणे हे चुकीचे नसून त्याला आता रनआऊटमध्ये गणले जाणार आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू केला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड ए विरुद्ध संजू सॅमसनची ‘कॅप्टन्स इनिंग’;तिलक, शार्दुलचीही चमकदार फलंदाजी
अर्जुन तेंडुलकरचा युवराज सिंगच्या वडीलांसोबत भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज