आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे . तत्पूर्वी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. तसेच त्याआधी भारतीय संघ आपल्या स्पर्धेची सुरुवात बांगलादेश विरुद्ध सामना खेळून करेल. भारत विरुद्ध पाकिस्तान महासामना 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली आहेत.
तसेच पाकिस्तान संघाचे पूर्व फलंदाज मोहम्मद युसुफ यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले भारतीय फलंदाजांशिवाय गोलंदाज शानदार खेळी खेळत करत आहेत. पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाच पारडं जड आहे.पण मोहम्मद युसुफ यांचे मत यावर वेगळे आहे.
मोहम्मद युसुफ यांचं म्हणणं आहे की ,भारताविरुद्ध पाकिस्तानच पारडं जड आहे, कारण पाकिस्तान संघाला दुबईमध्ये खेळण्याचा फायदा होईल. तसेच दुबईमध्ये पाकिस्तान संघ सातत्याने खेळत आहे .ज्याचा फायदा भारताविरुद्धच्या सामन्यात होऊ शकतो. सामा टीव्हीवर बोलताना युसुफ म्हणाले की, न्युझीलँडचा संघ सगळ्यात संतुलित दिसत आहे. त्यामुळेच न्युझीलँड संघाकडे चांगले खेळाडू आहेत .मिचेल सैंटनरकडे तीन वेगवान गोलंदाज याशिवाय चांगले फिरकीपटू आहेत. न्यूझीलंड संघाचे टॉप सहा खेळाडू शानदार आहेत .तसेच संघाचा यष्टीरक्षक किवी अष्टपैलू खेळाडू आहे.
त्यानंतर पुढे बोलताना युसुफ म्हणाले भारतीय संघ सुद्धा चांगला खेळाडूंचा आहे. पण पाकिस्तान संघाला दुबईमध्ये खेळण्याचा जास्त फायदा होईल. त्याशिवाय पाकिस्तान त्यांचे सामने घरेलू मैदानावर खेळणार आहे ,तसेच पाकिस्तानला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल तसेच तेही म्हणाले. आमच्या फलंदाजांना फिरकीपटूं विरुद्ध खेळताना धावा करण्याची पद्धत हुडकावी लागेल. यासोबतच कमीतकमी डॉट चेंडू खेळावे लागतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचे स्क्वॉड
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, रवींद्र जड़ेजा और वरुण चक्रवर्ती.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघाचे स्क्वॉड
मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, कामरान गुलाम, सऊद शकील, तैयब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह और शाहीन शाह अफरीदी.
हेही वाचा
IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध या खेळाडूने मारलेत सर्वाधिक षटकार, दुसरा जवळपासही नाही
Champions Trophy; अर्शदीप सिंग की हर्षित राणा कोणाला मिळणार संधी? मोठी अपडेट समोर
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला धक्का, प्रशिक्षकाने सोडली संघाची साथ, मायदेशी रवाना