---Advertisement---

महिला आयपीएलमुळे बीसीसीआय मालामाल, मीडिया राईट्ससाठी आघाडीच्या कंपनीने मोजले 951 कोटी

On: सोमवार, जानेवारी 16, 2023 1:23 PM
Jay-Shah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून एक मोठी माहिती समोर येत आहे. बीसीसीआयने महिला इंडियन प्रीमियर लीगसाठी मीडिया राईट्सचा करार केला आहे. वायकॉम 18 या कंपनीने महिला आयपीएलचे पुढच्या पाच वर्षासाठीचे मीडिया राईट्स खरेदी केले असून यासाठी त्यांना मोठी रक्कम खर्च करावी लागली आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी याविषयीची माहिती अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केली आहे.

जय शहा (Jay Shah) यांनी वाॉयकॉम 18 (Viacom 18) कंपनीला महिला आयपीएल (Womens IPL 2023) स्पर्धेचे मीडिया राईट्स खरेदी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच हे रईट्सची विकल्यानंतर बोर्डाला किती रुपयांचा फायदा झाला, याविषयीची माहिती देखील बीसीसीआय सचिवांनी दिली. शहांनी या सोशल मीडिया पोस्टमध्ये असेही सांगितले आहे की, महिला आयपीएलच मीडिया राईट्स हे पुडच्या पाच वर्षांसाठी विकले गेले आहे. म्हणजेच 2023 ते 2027 पर्यंत आयपीएल प्रसारणाची जबाबदारी वायकॉम 18 कंपनीकडे असेल.

प्रत्येक सामन्यासाठी वायकॉम 18 मोजणार 7.09 कोटी रुपये
जय शहा यांनी अधिकृत खात्यावरून केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “महिला आयपीएलचे मीडिया राईट्स जिंकण्यासाठी वायकॉम 18ला शुभेच्छा. वायकॉमसोबत पुढच्या पाच वर्षांच्यामीडिया राईट्ससाठी 951 कोटी रुपयांचा करार झाला आहे. एवढेच नाही एका सामन्यासाठी कंपनी 7.09 कोटी रुपेय मोजणार आहे.” महिला आयपीएलच्या मीडिया राईट्ससाठी वायकॉम 18 कंपनीने मोजलेली रक्कम मोठी असली तरी, पुरुषांच्या आयपीएलपुढे खूपच कमी वाटते. पुढच्या पाच वर्षांच्या पुरुष आयपीएल राईट्ससाठी बीसीसीआयला तब्बल 48,390 कोटी रुपये मिळाले आहेत.

दरम्यान, महिला आयीपएलच्या मीडिया राईट्ससाठी 16 जानेवारी (सोमवार) अर्ज मागवले गेले होतो. वायकॉम 18 सोबतच झी, सोनी आणि डिज्नी अशा काही मोट्या कंपन्या हे राईट्स खरेदी करण्यासाठी स्पर्धेत होत्या. मात्र, वायकॉम 18ने इतर कंपन्यांना मागे टाकत बीसीसीआयसोबत करार केला. माहितीनुसार फ्रँचायझींची मालकी मिळवण्यासाठी 25 जानेवारीपासून अर्ज मागवले जाणार आहेत. लवकरच या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला जाणार आहे. लिलावाची तारीख अद्याप समोर आली नाहीये. महिला आयपीएलच्या आगामी हंगामाचे वेळाप्रक देखील अजून निश्तिक केले गेले नाहीये. पण स्पर्धा 3 ते 26 मार्च दरम्यान खेळली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  (Viacom 18 bought media rights of Women’s IPL for 951 crores)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रीय संघातून पुन्हा डावलल्यामुळे सरफराज टेंशनमध्ये! म्हणाला, ‘रात्रभर झोपलो नाही…’
सूर्यकुमार यादव टी-20त सुपरहिट, पण वनडेत फ्लॉप! तिरुअनंतपुरममध्ये पुन्हा ठरला अपयशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---