---Advertisement---

आनंदी आनंद गडे! दीपक चाहरच्या साखरपुड्याचे चेन्नईकडून जोरदार सेलिब्रेशन; धोनी, रैनाचीही मस्ती

---Advertisement---

दुबई। गुरुवारी (७ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात ५३ व्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने ६ विकेट्सने पराभूत केले. असे असले तरी या सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या साखरपुड्याची झाली. त्याने त्याची प्रेयसी जया भारद्वाजबरोबर सामन्यानंतर स्टेडियममध्येच साखरपुडा उरकला. त्याच्या सारखपुड्याचे चेन्नई सुपर किंग्स संघाने जोरदार सेलिब्रेशन केले.

चेन्नईच्या खेळाडूंकडून जोरदार सेलिब्रेशन 
या सामन्यानंतर हॉटेलमध्ये परतल्यानंतर चेन्नई संघातील खेळाडू, त्यांचे कुटुंबिय आणि स्टाफमधील सदस्यांकडून दीपकच्या साखरपुड्याचे जोरदार सेलिब्रेशन झाले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की चेन्नई संघ हॉटेलमध्ये प्रवेश करतो, तेव्हा दीपक आणि जयाचे जोरदार स्वागत केले जाते. यानंतर हे दोघेही केक कापून तो एकमेकांना भरवून तोंड गोड करतात. केक कापल्यावर मात्र, चेन्नईचे खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये येतात. यावेळी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी चाहरला पकडतो. त्यावेळी बाकी खेळाडू येऊन दीपकच्या चेहऱ्यावर आणि जर्सीवर केक फासतात.

केक लावून झाल्यावर दीपकला तिथेच सोडून पटपट खेळाडू बाजूला पळून जातात. यात सुरेश रैना, रॉबिन उथप्पा या खेळाडूंचाही समावेश आहे. तसेच याच वेळी एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी जयाला केक चारते आणि थोडा केक तिच्याही चेहऱ्याला लावते.

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एमएस धोनीची मुगली झिवा आणि सुरेश रैनाची मुलगी ग्रेशिया आपल्या वडीलांना जाऊन मिठी मारताना दिसतात. या क्षणाकडेही अनेक चाहत्यांनी लक्ष वेधले आहे.

https://www.instagram.com/p/CUu4P7HFscm/

https://twitter.com/ChennaiIPL/status/1446149069613633542

स्टेडियममध्ये दीपकने घातली जयाला मागणी
चेन्नई विरुद्ध पंजाब सामना संपताच दीपक खेळाडूंचे कुटुंबिय बसतात त्या स्टँडमध्ये गेला आणि त्याने सर्वांसमोर तिथे काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या जयाला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घातली. तिनेही क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मागणीला होकार दिला. तिने होकार दिल्यानंतर दीपकने तिच्या बोटात अंगठी घातली.

त्यानंतर त्याने त्याच्या खिशातून आणखी एक अंगठी काढून तिच्याकडे दिली. तिने ती दीपकच्या बोटात घातली. या क्षणाला दीपकने खास क्षण म्हटले आहे. तसेच या गोड क्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

https://twitter.com/deepak_chahar9/status/1446145066821554181

चेन्नईचा पराभव
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसने केलेल्या ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १३४ धावा केल्या होत्या. त्यानंतर १३५ धावांचा पाठलाग पंजाबने १३ षटकांतच पूर्ण केला. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ९८ धावांची खेळी केली. असे असले तरी चेन्नई सुपर किंग्सने यापूर्वीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

प्लेऑफचे सामने १० ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘ती परदेशी नाही, तर दिल्लीची मुलगी’, दीपक चाहरने प्रपोज केलेल्या मुलीबद्दल बहिणीने दिली माहिती

Video: चेन्नईने सामना गमावला, पण दीपक चाहरने प्रेमाची मॅच जिंकली, स्टँडमध्ये जाऊन गर्लफ्रेंडला केले प्रपोज

विरोधी संघाला १०० धावांच्या आत ऑलआऊट करण्यात ‘या’ ३ संघांचा दबदबा, केकेआर अव्वल स्थानी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---