---Advertisement---

VIDEO: पहिल्यांदा विकेटचा जल्लोष, पुढच्याच क्षणी तापले वातावरण! जड्डू-शार्दुल भर मैदानात भिडले

On: सोमवार, मे 25, 2026 3:15 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ हंगामासाठी अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यानंतर रविवारी (२४ मे) राजस्थान रॉयल्सने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. त्यांनी या त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत प्लेऑफचे स्थान निश्चित केले. या सामन्याचा काय निकाल लागला यापेक्षा सर्वाधिक चर्चा रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर यांच्यात घडलेल्या चकमकीची झाली. दोघांच्या या घटनेचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज आणि भारतीय संघाकडून एकत्र खेळलेले हे दोन्ही खेळाडू चांगले मित्र आहे, मात्र यावेळी संघ वेगळे होते. शार्दुल मुंबईकडून आणि जडेजा राजस्थानकडून खेळत होता. सामन्यावेळी मैदानावर या दोघांमध्ये जे घडले, त्याची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. नेमके काय घडले, हे जाणून घेऊ.

या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि ही घटना राजस्थानच्या डावादरम्यान घडली. शेवटच्या षटकात जडेजा आणि नांद्रे बर्गर क्रीजवर होते. शार्दुलच्या त्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर जडेजाने चार धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात जडेजा हार्दिकला झेल देत बाद झाला. तेव्हा शार्दुलने त्याच्यासमोर जोरदार जल्लोष केला, मात्र अंपायरने त्या चेंडूला नो-बॉल घोषित केले आणि जडेजा नाबाद राहिला.

त्यानंतर जडेजाने पुढच्या दोन चेंडूवर लागोपाठ दोन चौकार मारले, मग शार्दुलला चिडवण्यासाठी त्याच्यासमोर तसाच जल्लोष केला. त्यावेळी दोन्ही खेळाडू हसताना दिसले.

या सामन्यात जडेजा ११ चेंडूंत १९ धावा करत नाबाद राहिला. तसेच राजस्थानने ध्रुव जुरेलच्या ३८ धावा आणि जोफ्रा आर्चरच्या ३२ धावांच्या जोरावर २० षटकांत ८ विकेट्स गमावत २०५ धावा केल्या. यामध्ये मुंबईकडून शार्दुल आणि दीपक चाहर यांनी सर्वाधिक अशा प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई २० षटकांत ९ विकेट्स गमावत १७५ धावाच करू शकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---