पूर्ण क्रिकेटविश्वात सध्या टी-२० क्रिकेटचे वर्चस्व आहे. या स्वरुपातील वेगवेगळ्या लीगमध्ये जगभरातील अनेक प्रतिभाशाली खेळाडू दिसून येतात. दरम्यान फलंदाज आक्रमक फलंदाजी करत मोठमोठे फटकार मारताना दिसतात. तर गोलंदाजही अविश्वसनीय विकेट्स घेताना दिसतात. पाकिस्तान सुपर लीगच्या २०२१ चा क्वालिफायर सामना सोमवारी (२१ जून) इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध मुलतान सुलतांस असा झाला.
या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज खुशदील शाहाने अशी जोरदार फलंदाजी केली, ज्यामुळे प्रत्येक क्रिकेटचाहत्यांचे मन आनंदित होईल. अबूधाबीच्या शेख जायेद मैदानावर इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध मुलतान सुलतांसचा फलंदाज खुशदील शाहाने एकामागे एक असे सलग ४ षटकार एकाच षटकात मारले आहेत.
हे सर्व सामन्याच्या १९ व्या षटकात घडले. आखिफ जावेदच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूत एक धावा काढत सोहेल तन्वीरने २ चेंडूत ५ धावा घेतल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने लॉन्ग ऑनवरून एक सुंदर षटकार ठोकला आणि पुढील ३ चेंडूतही त्याने त्याच्या शक्तीचे प्रदर्शन दाखवत सलग ३ षटकार खेचले. अशाप्रकारे त्याने एका षटकात ४ षटकार ठोकले आणि या षटकात एकूण २९ धावा आल्या. यादरम्यान आखिफ जावेदच्या चेहऱ्यावर थोडीसी निराशा दिसून आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.
DHUZZ DHUZZ DHUZZ DHUZZ💥
Four sixes in a row by @KhushdilShah_ #HBLPSL6 | #MatchDikhao | #IUvMS pic.twitter.com/jhvSgZsO8p
— PakistanSuperLeague (@thePSLt20) June 21, 2021
या षटकापुर्वी जावेदने ३ षटकांत २१ धावा दिल्या होत्या, तर ४ षटकांनंतर ही आकडेवारी ५० धावांवर पोहोचली. या सामन्यात खुशदिलने २२ चेंडूत ५ षटकार ठोकत नाबाद ४२ धावा केल्या. मुलतान सुलतांसने २० षटकांत ५ बाद १८० अशी धावसंख्या उभी केली. संघासाठी मकसूदने ४१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. तर जॉन्सन चार्ल्सने २१ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा फटकावल्या. मुलतान सुलतांसने हा सामना ३१ धावांनी जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.
महत्वाच्या बातम्या
राजस्थान रॉयल्सला बसणार मोठा झटका! ‘असे’ झाल्यास शतकवीर उर्वरित सामन्यांना मुकणार
पावसाच्या व्यत्ययानंतर सर्वांना राखीव दिवशी सामना होण्याची आस, पण अंतिम निर्णय होणार ‘या’दिवशी
WTC अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात पंत सपशेल फ्लॉप, केली ३ वर्षांपुर्वीच्या चुकीची पुनरावृत्ती