आयसीसी टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022मध्ये अनेक धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले. सुपर 12मध्ये दोन वेळेचा विजेता वेस्ट इंडिज पोहोचली नाही, तर इंग्लंडला सुपर 12मध्ये आयर्लंडने आणि पाकिस्तानला झिम्बाब्वेने पराभूत केले. हे सर्व पाहायला मिळाले असताना साखळी सामन्याच्या शेवटच्या दिवशीही मोठा बदल दिसला. तेव्हा नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. अंतिम सामना झाल्यानंतर आयसीसीसने दोन दिवसांतच सामना बदलणारे क्षण कोणते ते सांगितले आहे. त्यामध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचाही समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोलोफ व्हॅन डर मर्वेचा झेल
नेदरलॅंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ जेव्हा संघर्ष करत होतातेव्हा क्रीझवर डेविड मिलर होता. यामुळे आफ्रिकेला जिंकण्याची अपेक्षा होती. ब्रेंडन ग्लोवर याने टाकलेला चेंडू मिलरने हवेत खेळला आणि रोलोफ व्हॅन डर मर्व याने सूर मारत उत्तम झेल घेतला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने गमावला आणि पुढे पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले.
हरिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीने ठोकलला षटकार
भारत-पाकिस्तान यांच्यात त्यांचा सुपर 12चा पहिला सामना झाला. भारताला जिंकण्यासाठी शेवटच्या 8 चेंडूत 28 धावांची आवश्यकता होती. विराट कोहली (Virat Kohli) स्ट्राईकवर होता आणि हॅरिस रौफ गोलंदाजी करत होता. त्याच्याआधी हॅरिसने 3.4 षटकात 24 धावा दिल्या होत्या आणि भारताला संघात परतण्यासाठी पुढील दोन चेंडू सीमारेषेपार मारणे गरजेचे होते. तेव्हा हॅरिसने उत्तम चेंडू फेकला आणि विराटने त्याला फ्लिक करत षटकार मारला. त्याच्या पुढच्या चेंडूवरही त्याने षटकार मारला. मात्र त्याने पाचव्या चेंडूवर मारलेला षटकार आतापर्यंतचा सर्वोत्तम शॉट होता.
https://www.instagram.com/reel/CkDhVWjLiyF/?utm_source=ig_web_copy_link
आयसीसीने इंग्लंडने न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याला कसे बाद केले, अंतिम सामन्यात शाहीन शाह आफ्रिदी याने घेतलेला हॅरी ब्रूक्स याचा झेल आणि सिकंदर रझा याचे पाकिस्तान विरुद्ध शादाब खान आणि हैदर अली यांच्या घेतलेल्या विकेट्सचाही समावेश केला.
3. इंग्लंडसाठी न्यूझीलंड विरुद्ध खेळलेला सुपर 12चा सामना करो वा मरो अशा स्थितीत होता. जो त्यांनी 20 धावांनी जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडला जिंकण्यात 16 चेंडूत 45 धावांची आवश्यकता होती. सॅम करन याच्या गोलंदाजीवर फिलिप्सने सीमारेषेवर सब्स्टिट्यूड क्रिस जॉर्डन याला झेल दिला आणि 36 चेंडूत 62 धावा करत बाद झाला.
4. तसेच अंतिम सामन्यात हॅरीचा झेल घेतानाच शाहीनला दुखापत झाली ज्यामुळे तो पुढे खेळू शकला नाही आणि पाकिस्तान हरण्याचे हे मोठे कारण ठरले.
5. 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून शान मसूद आणि शादाब खान उत्तम फलंदाजी करत क्रीझवर टीकून होते. त्यानंतर रझा आला आणि त्याने पहिले शादाब खान आणि नंतर हैदर अली यांना बाद करत सामन्याचा निकालच बदलला. VIDEO: Match-changing moments in t20 World cup picked by ICC, including Virat Kohli’s ‘that’ six against Pakistan
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही’ गोष्ट बदला, कर्णधार बदलून काय होणार, टीम इंडियाला इरफान पठाणचा सल्ला
थॅन्क्यू पॉली! 13 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत मुंबईला यशाच्या शिखरावर नेणारा ‘बिग मॅन’