वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड याने मंगळवारी (15 नोव्हेंबर) आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2023 रिटेन्शनआधी त्याने हा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला. पुढील हंगामात तो मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडेल. आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत मुंबई इंडियन्ससाठी खेळताना त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. आपण त्याच्या याच शानदार आयपीएल कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत.
𝐘𝐎𝐔 𝐌𝐀𝐃𝐄 𝐔𝐒 𝐀𝐋𝐋 #𝐁𝐄𝐋𝐈𝐄𝐕𝐄 💙
Tribute to the glorious 1️⃣3️⃣ seasons in MI Blue and Gold. Thank you, Polly! #OneFamily #MumbaiIndians @KieronPollard55 pic.twitter.com/8IC01Y5fCE
— Mumbai Indians (@mipaltan) November 15, 2022
सन 2009 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पोलार्ड हे नाव जगासमोर आले होते. त्रिनिदाद ऍन्ड टोबॅगोसाठी तुफानी फलंदाजी करत त्याने लक्ष वेधून घेतलेले. आयपीएल 2010 लिलावात चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मागे टाकत मुंबईने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. तेव्हापासून तो मुंबईच्या संघाचा अविभाज्य घटक बनला.
त्याने पहिल्याच हंगामात आपल्या कामगिरीने संघाला अंतिम फेरीत नेले. अंतिम फेरीतही तो मैदानावर असेपर्यंत मुंबईला विजयाची खात्री होती. त्यानंतर 2013, 2015, 2017, 2019 व 2020 असे पाच वेळा तो संघात असताना मुंबईने विजेतेपद पटकावले. पोलार्ड हा मुंबईसाठी आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा (3915) करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 223 षटकारांसह तो अव्वलस्थानी आहे. एकाच संघासाठी सर्वाधिक 103 झेलही त्यानेच टिपलेले आहेत. आयपीएलमध्ये कोणत्याही विदेशी खेळाडूने सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा 14 सामनावीर पुरस्कारांसह पाचवा क्रमांक लागतो. तसेच मुंबईसाठी 17 चेंडूवर संयुक्तरित्या अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. आपल्या एकूण आयपीएल कारकिर्दीत त्याने 147.32 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. तसेच तब्बल सहा आयपीएल अंतिम सामने खेळताना त्याचा स्ट्राईक रेट सर्वाधिक 195.65 असा राहिलाय.
खेळाडू म्हणून मुंबई सोबतचा प्रवास संपला असला तरी, आता पुढील हंगामापासून तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. इथेही अशाच प्रकारचे यश मिळवण्याचा त्याचा मानस असेल.
(Kieron Pollard Illustrative IPL Career For Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! ‘मुंबई नाही तर कोणासाठीच नाही’, कायरन पोलार्डची आयपीएलमधून निवृत्ती