पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज अष्टपैलू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने मंगळवारी (15 नोव्हेंबर) आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने ही माहिती ट्विट करत चाहत्यांना दिली. त्याला मुंबई संघातून काढले जाणार, हे समोर येताच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्याचा हा मुंबई बरोबरचा 13 वर्षांचा प्रवास संपला असे काही जणांचा वाटत असेल, मात्र तसे नाही.
कायरन पोलार्ड याने निवृत्ती जाहीर करताच अनेकांना वाटले त्याचा आणि एमआयचा (मुंबई इंडियन्स) प्रवास संपला, मात्र असे नाही. त्याने त्याचे मुंबईशी आपले कायम नाते राहिल अशा अविर्भावात निवृत्तीबाबत ट्वीट केले. त्याने संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी घेण्याचे स्विकारले आहे. त्याबरोबरच तो एमआय इमिरेट्स या संघासाठीही खेळणार आहे. हा संघ युनायटेड अरब अमिरातीच्या आयएल टी20 लीगचा भाग आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने हा संघ विकत घेतला आहे. Kieron Pollard will be batting coach of Mumbai Indians
या ट्विटमध्ये पोलार्डने लिहिले, ‘मी मुंबईशिवाय दुसऱ्या कोणत्याच संघाकडून खेळू इच्छित नाही. हा भावनिक निरोप नसून मी मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक होण्याचे स्विकारले आहे. या लीगमध्ये मी जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळलो. चाहत्यांनीही भरभरून प्रेम दिले. मुंबई इंडियन्ससोबत मी 2011 आणि 2013मध्ये चॅम्पियन्स लीग जिंकलो. तसेच 2013, 2017, 2019 आणि 2020मध्ये आयपीएलचे विजतेपद जिंकले.’
????#OneFamily @KieronPollard55 pic.twitter.com/K5BVlTDeN0
— Mumbai Indians (@mipaltan) November 15, 2022
आयपीएलची सुरूवात एकाच संघाकडून करताना शेवटही त्याच संघाकडून करणाऱ्या खेळाडूंपैकी एक पोलार्ड आहे. त्याचबरोबर तो आयपीएलचे 100पेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 2008), सुनील नरेन (कोलकाता नाईट रायडर्स 2011), जसप्रीत बुमराह (2013 पासून मुंबई) आणि लसिथ मलिंगा (कारकिर्दीत दोन वेळा मुंबईकडून) या मोजक्याच खेळाडूंपैकी एक आहे.
पोलार्डने 2010मध्ये आयपीएल पदार्पण करताना आतापर्यंत या लीगचे 189 सामने खेळताना 3412 धावा केल्या असून त्यामध्ये 16 अर्धशतके, 218 चौकार आणि 223 षटकारांचा समावेश आहे. तसेच त्याने 69 विकेट्सही घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी कर्णधार हार्दिक करतोय एन्जॉय! शर्टलेस फोटो झाले व्हायरल
संघाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी बीसीसीआयची धडपड, भारताच्या टी20मध्ये धोनीला मिळू शकते मोठी भूमिका