---Advertisement---

व्वा! यष्टीचा निशाणा हुकला आणि चेंडू अंपायरला लागला, मग काय रिषभने मोठ्या मनाने मागितली माफी

On: सोमवार, एप्रिल 26, 2021 1:21 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत आतापर्यंत अनेक अटीतटीचे सामने पाहायला मिळाले आहेत. रविवारी (२५ एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार देखील पाहायला मिळाला होता. या सामन्यात दिल्ली संघाने विजय मिळवला. तसेच या रोमांचक सामन्यातील दुसऱ्या डावात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतच्या हातून असा काही प्रकार घडला होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, जेव्हा दुसऱ्या डावात हैदराबाद संघ दिल्ली संघाने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी १३ व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजी करण्यासाठी आला होता. तसेच स्ट्राइकवर केन विलियमसन होता. अक्षरने टाकलेल्या चेंडूवर विलियमसनने शॉट खेळून चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. तो चेंडू पंतच्या हातात गेला होता. तो चेंडू पंतने उचलून नॉन स्ट्राइकच्या दिशेने फेकला परंतु चेंडू स्टंपला न लागता अंपायरला लागला होता.

त्यानंतर रिषभने अंपायरची माफी देखील मागितली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर चाहते आपली प्रतिक्रिया देत आहेत.

https://twitter.com/CricketUnlimi/status/1386366941518909440?s=20

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉच्या ५३ आणि रिषभ पंतच्या ३७ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली संघाने १५९ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून, केन विलीयमसनने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली होती तर जॉनी बेअरस्टोने ३८ धावा केल्या होत्या. २० षटक अखेर हैदराबाद संघाला देखील १५९ धावा करण्यात यश आले होते.

तसेच सुपर ओव्हर सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करण्यासाठी डेविड वॉर्नर आणि केन विलियमसन या दोघांना फलंदाजी करण्यासाठी पाठवले होते. या दोघांनी मिळून अवघ्या ७ धावा केल्या होत्या. ८ धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली संघाकडून रिषभ पंत आणि शिखर धवन यांची जोडी मैदानात आली होती. या दोघांनी दिल्ली संघाला शेवटच्या चेंडूवर १ धावाची आवश्यकता असताना १ धाव करत सामना जिंकून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: चिडका पृथ्वी शॉ! धावबाद झाल्यानंतर पंतवर संतापला, डगआउटमध्ये केलं असं काही

सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची बाजी; दिग्गज संतापून म्हणाला, ‘तो टॉयलेटला गेला होता का, फलंदाजीला पाठवलं नाही’

विजयाच्या आनंदावर पसरलं दु:खाचं सावट, सीएसकेतील ‘या’ प्रमुख सदस्याची मालवली प्राणज्योत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---