आयसीसी महिला विश्वचषकामध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करताना दिसत नसून भारतीय संघाने आतापर्यंत पाचपैकी तीन सामने गमावले आहेत. भारताने आतापर्यंत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या संघाचा पराभव केला आहे, तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता भारताचा पुढचा सामना २२ मार्चला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. शनिवारी (१९ मार्च) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील शेफाली वर्माचा शॉटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारतीय महिला संघासाठी फलंदाजी ही अजूनही मोठी समस्या आहे. भारताची युवा सलामीवीर शेफाली वर्माला पहिल्या सामन्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) सामन्यात ती चांगली खेळताना दिसली होती, पण तिला मोठी खेळी खेळता आली नाही. शेफाली वर्माच्या एका शॉटची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. शेफाली तिच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखली जाते, तिला ‘लेडी सेहवाग’ देखील म्हणले जाते.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने पुन्हा एकदा संघात पुनरागमन केले. विश्वचषकाच्या या १८व्या सामन्यादरम्यान पाचव्या षटकात तिला फुल लेंथ चेंडू मिळाला, ज्याची ती खूप काळ वाट पाहत होती. चेंडू तिच्या पारड्यात पडत असल्याचे पाहून त्याला तिने जोरात मारले आणि चेंडू थेट साइटच्या समोर जाऊन पडद्यावर आदळला. आयसीसीने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर अनेक चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/reel/CbRGL4WFI4x/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनीही जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “शेफालीने शेवटच्या दिवसापर्यंत फलंदाजी केली, तर ती रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रमही मोडू शकते.” आणखी एका युजरने लिहिले आहे की, “दोन सामन्यांसाठी बाहेर काय केले, लोक तिला कमी लेखू लागले.”
या शॉटनंतर शेफाली जास्त वेळ फलंदाजी करू शकली नाही आणि ती १२ धावांवर डार्सी ब्राउनच्या चेंडूवर बाद झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या फलंदाजीपुढं न्यूझीलंडच्या गोलंदाजांची दैना, १ विकेटने मिळवला विजय
विंडीजच्या कर्णधाराने तब्बल ७१० मिनिटे केली फलंदाजी; एकट्याने ८१.३ षटके खेळत रचला ‘हा’ मोठा विक्रम
आयपीएल २०२२मध्ये ‘हे’ ५ खेळाडू चालले, तर दिल्ली कॅपिटल्स संघ मिळवू शकतो पहिलेच विजेतेपद