भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश आहे. इथे चाहते क्रिकेटपटूंवर जीव ओवाळून टाकताना दिसतात. त्या बदल्यात अगदी क्रिकेटपटूही त्यांच्या चाहत्यांना भरभरून प्रेम देताना दिसतात. मात्र युवा भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याने त्याच्या चाहत्यासोबत अशी काही कृती केली आहे, ज्यानंतर त्याच्यावर टिकेचा भडिमार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील बेंगलोर येथे झालेल्या पाचव्या टी२० सामन्यादरम्यान त्याने ही कृती केली आहे.
सोशल मीडियावर ऋतुराजचा (Ruturaj Gaikwad) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ ऋतुराज त्याला भेटायला आलेल्या एका चाहत्याला हाताने धक्का दे बाजूला सरकवत असल्याचे दिसत आहे.
व्हिडिओत दिसते की, पाऊस सुरू असताना बेंगलोरमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमचा एक ग्राउंड्समन (Ruturaj Gaikwad Disrespectful Behaviour With Groundsman) सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या डगआऊटमध्ये येतो. यावेळी भारतीय संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज त्याच्या संघ सहकाऱ्यांसोबत डगआऊटमध्ये बसलेला असतो. डोक्यावर हेल्मेट, हाती बॅट, पायावर पॅड्स आणि निळी जर्सी घालून तो बसलेला असतो. यावेळी तो ग्राउंड्समन येऊन त्याच्या बाजूला बसतो आणि त्याच्यासोबत एक सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो.
पण तो ग्राउंड्समन जवळ बसल्याचे पाहताच ऋतुराज त्याला हाताने धक्का देत दूर सरकायला सांगतो. यावर तो ग्राउंड्समन लगेचच त्याचे म्हणणे ऐकत बाजूला सरकतो. त्यानंतरही तो ऋतुराजसोबत सेल्फी काढण्यासाठी फोन हातात पकडून बसलेला असतो. परंतु ऋतुराज त्याच्यावर दुर्लक्ष करतो. तो ग्राउंड्समन पुन्हा पुन्हा त्याला आवाज देतो, तरीही ऋतुराज त्याच्याकडे न बघता त्याच्या बाजूला बसलेल्या खेळाडूसोबत बोलत बसतो.
https://twitter.com/iamshinde83/status/1538558545901547520?s=20&t=8JZWUWOSTLGEqgXZbO4_8Q
ऋतुराजने ग्राउंड्समनला दिलेल्या या वागणूकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने ग्राउंड्समनला दिलेल्या वागणूकीवर क्रिकेटचाहते संतापले आहे आणि त्यांनी ऋतुराजला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
https://twitter.com/imarnav_904/status/1538549132482076673?s=20&t=A67Ly3BVMjdc9zYsrxx–Q
दरम्यान भारतीय संघाचे भारतभूमीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपुरेच राहिले आहे.बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अखेरचा टी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला, जो निर्णायक होता. पावसामुळे केवळ ३.३ षटकांचा खेळ होऊ शकला, ज्यामध्ये भारतीय संघाने २ विकेट्सच्या नुकसानावर २८ धावा केल्या. त्यानंतर पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यामुळे अखेर सामना रद्द करण्यात आला आणि मालिका २-२ ने बरोबरीत सुटली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बड्या दिलाचा माणूस! विश्वचषक विजेता क्रिकेटर पेट्रोल पंपावर वाटतोय चहा, कारण कौतुकास्पद
‘सिक्सर किंग’ युवराजने मुलाचे ठेवले हटके नाव, चाहत्यांना दाखवली लाडक्याची झलक; पाहा गोंडस PHOTO
नाणेफेकीच्या बाबतीत कर्णधार पंतला नाही मिळाली नशिबाची साथ, नावावर झाला लाजिरवाणा रेकॉर्ड