भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज तसेच आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणारा रिषभ पंत सध्या आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यामुळे आपल्या घरी आहे. मैदानात सतत काही-ना-काही कारनामा करणारा हा युवा खेळाडू घरी देखील शांत बसताना दिसून येत नाहीये. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेत युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच स्पर्धा स्थगित झाल्यामुळे हा खेळाडू आपल्या घरीच फिटनेसवर काम करताना दिसून येत आहे. परंतु फिटनेस करण्यासाठी त्याने आगळ्या वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला आहे.
त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये योगा किंवा व्यायाम नव्हे तर तो गवत कापताना दिसून येत आहे. अर्थातच तो स्वतला फिट ठेवण्यासाठी आपल्या घराच्या लॉनमधील गवत कापत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. त्याने या व्हिडिओला कॅप्शन म्हणून, ‘ये दिल मांगे “मोव्हर”! सक्तीने घ्यावी लागलेली क्वारंटाईन सुट्टी. पण मी आनंदीत आहे की, मला इनडोअर सक्रिय राहायला मिळत आहे. कृपया सर्वांनी सुरक्षित राहा.’ असे लिहिले आहे.
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात रिषभ पंत भारतीय संघासाठी प्रमुख भूमिका बजावताना दिसून येणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत रिषभ पंतने उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिले होते.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सामन्यातही रिषभला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
Ye Dil Mange "Mower"!
Forced quarantine break but happy to be able to stay active while indoors. Please stay safe everyone.#RP17 pic.twitter.com/6DXmI2N1GY— Rishabh Pant (@RishabhPant17) May 11, 2021
रिषभ पंतची आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
आयपीएल २०२१ स्पर्धेत युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. आयपीएल २०२१ स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या गुणतालिकेत १२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत ८ सामने खेळले. यात त्यांना ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले, तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच रिषभ पंतने या ८ सामन्यात ३५.५० च्या सरासरीने २१३ धावा केल्या होत्या. यात नाबाद ५८ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो,’ अभिनेत्रीसोबत आपले नाव जोडणाऱ्यांना ऋतुराजचा मराठीत टोमणा!
‘हे’ २ धाकड अष्टपैलू एकत्र खेळले तर भारत नक्कीच कसोटी चॅम्पियनशीप जिंकेल; माजी खेळाडूचे भाष्य
रोहित-कोहली नव्हे तर ‘हे’ ३ खेळाडू ठरू शकतात कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये सामनावीर पुरस्काराचे मानकरी