भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा वनडे सामना रांची येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने सात गड्यांनी विजय मिळवत मालिका बरोबरीत आणली. गोलंदाजांनी अखेरच्या षटकात केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 278 पर्यंत रोखले होते. त्यानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी दीडशतकी भागीदारी करत संघाचा विजय सुकर केला. भारतीय संघाने या सामन्यात शानदार विजय मिळवला असला तरी, संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा एका वादात अडकला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 48 व्या षटकात ही घटना घडली. सिराजने टाकलेला चेंडू फलंदाज केशव महाराज हा मारू शकला नाही. यष्टिरक्षक संजू सॅमसनने यानंतर तो चेंडू पकडत सिराजकडे फेकला. तेव्हा शिराज नाही पाहिले की नॉन स्ट्राइकला असलेला डेव्हिड मिलर काहीसा पुढे आला आहे. तेव्हा सिराजने थ्रो करत मिलरला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू स्टम्पसवर लागू शकला नाही. त्यानंतर चेंडू थेट सीमारेषा पार गेला. तेव्हा पंच वीरेंद्र शर्मा यांनी बाय स्वरूपात चार धावा दिल्या. या विचित्र घटनेनंतर सिराज पंचांशी वाद घालताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे सिराज या सामन्यातील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 38 धावांमध्ये तीन गडी बाद केले.
https://twitter.com/Cricket58214082/status/1579078957739433985?t=nHwzh_rSDpt9jYty2hSNAA&s=19
या सामन्या बद्दल बोलायचे झाल्यास दक्षिण आफ्रिकेने रीझा हेन्ड्रिक्स आणि ऐडन मार्करम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 279 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारतातर्फे ईशान किशनने 93 तर श्रेयस अय्यरने नाबाद 113 धावांची खेळी करत संघाला सात गड्यांनी विजय मिळवून दिला. मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना दिल्ली येथे 11 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
श्रेयस-इशानच्या तुफानाने मालिका बरोबरीत! रांची वनडेत टीम इंडिया वरचढ
रांचीचा नवा राजकुमार! घरच्या मैदानावर इशान किशनचा धमाका; वादळी खेळीने मिळवली वाहवा






