---Advertisement---

IND vs SA: व्हिडीओ व्हायरलः शतकवीर संजू सॅमसनने हटक्या पद्धतीने केले सेंच्युरी सेलीब्रेशन

On: शुक्रवार, डिसेंबर 22, 2023 12:19 PM
Sanju-Samson
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक संजू सॅमसन याच्यासाठी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत खेळला गेलेला मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना खूपच संस्मरणीय ठरला. पर्ल येथील बोलाद पार्क येथे त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या सातत्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध शतक झळकावून त्याने स्वत:ला जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची सेलिब्रेशन करण्याची पद्धत चर्चेचा विषय बनली आहे.

संजू सॅमसन (Sanju Samson) याने 44 व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले, त्यानंतर त्याने प्रथम बॅट आणि हेल्मेट उंचावत प्रेक्षकांच्या जल्लोषाला प्रतिसाद दिला. त्यानंतर उजवा हात हलवून आनंद साजरा केला. त्याच्या बायसेप्स सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर प्रेक्षकांना त्याच्या फिटनेसचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.

संजू सॅमसन बर्‍याचदा वेट लिफ्टिंग करताना दिसतो, ज्यामुळे त्याचे स्नायू वाढतात आणि त्याचे बायसेप्स देखील वाढतात. हा त्याचा आवडता व्यायाम आहे ज्यामुळे शरीराची ताकदही वाढते. तुमच्या शरीराला आकार देण्यासाठी तुम्ही या व्यायामाचीही मदत घेऊ शकता.

संजू सॅमसन त्याच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक आहे, जुलै 2023 मध्ये त्याचा एक वर्कआउट फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो बेंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये गळ्यात साखळी बांधून वर्कआउट करताना दिसला होता. त्याच्या तीव्र व्यायामामुळे लोक त्याची तुलना WWE स्टार जॉन सीना याच्याशी करू लागले. या व्यायामामुळे पायाचे स्नायूही मजबूत होतात. (Video Viral Centurion Sanju Samson celebrated his century in a wrong way)

हेही वाचा

IND vs PAK: ठरलं तर! ‘या’ तारखेला भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने, खेळणार वर्ल्डकपचा सामना
चुक नडली! उस्मान ख्वाजाला एका चुकीसाठी आयसीसीचा मोठा दंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---