भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) वनडे सामन्याने सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. पण या दौऱ्यादरम्यान कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. याबद्दल क्रिकेटवर्तुळात बरीच चर्चा झाली. पण आता खुद्द विराटने प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराटने याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. तो म्हणाला, ‘मी पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे. त्यामागे एक कारण आहे की आपल्याकडे क्वारंटाईनचे नियम आहेत. हेच मी संघ निवडीच्या बैठकीत निवडकर्त्यांना समजावले आहे. मला वेळेवर माझ्या पत्नीजवळ पोहोचायचे आहे. कारण आमच्या पहिल्या बाळाचा जन्म होणार आहे. आमच्यासाठी हा खुप खास आणि सुंदर क्षण असेल आणि मला तो अनुभवायचा आहे. पालकत्व रजा घेण्यामागे हेच कारण होते आणि मी हे निवडकर्त्यांशी बोललो आहे.’
I wanted to be back home in time to be with my wife for the birth of our first child: @imVkohli #TeamIndia pic.twitter.com/oyYHMA6Vtt
— BCCI (@BCCI) November 26, 2020
या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट मायदेशात परतण्याआधी २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे आणि ४ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी२० मालिकेत खेळणार आहे. तसेच तो १७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातही खेळेल. कसोटी मालिकेतील पहिला सामना दिवस-रात्र असेल. तो ऍडलेड येथे खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर विराट भारतात येणार आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्मा त्यांच्या पहिल्या बाळाला जानेवारी २०२१ मध्ये जन्म देणार आहे.
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक जास्त वेळा नाबाद राहणारे ३ भारतीय फलंदाज
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज
महत्त्वाच्या बातम्या –
आश्चर्यकारक! ‘करोडपती’ मलिंगा आई-वडिलांना दहा वर्षे भेटलेलाच नाही
भारत-ऑस्ट्रेलिया संघ फिलीप ह्युजेसला देणार श्रद्धांजली; डोक्याला चेंडू लागून झाला होता मृत्यू
‘तीन विश्वचषकात यष्टीरक्षण करायचे आहे’, भारतीय क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा