---Advertisement---

Vijay Hazare Trophy: हिमाचल प्रदेशला पहिले जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी, फायनलमध्ये तमिळनाडूशी करणार दोन हात

On: शनिवार, डिसेंबर 25, 2021 8:57 PM
Rishi-Dhawan
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या खेळली जात असलेली विजय हजारे ट्रॉफी (vijay hazare trophy 2021) अंतिम टप्प्यात पोहचली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २६ डिसेंबरला (रविवार) खेळला जाणार आहे. शुक्रवारी (२३ डिसेंबर) स्पर्धेचे दोन्ही उपांत्य सामने खेळले गेले आणि अंतिम सामन्यासाठी संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या उपांत्य सामन्यात हिमाचल प्रदेश (himachal pradesh) संघाने सर्विसेज (services) संघाला ७७ धावांनी पराभूत केले. तर दुसऱ्या सामन्यात तामिळनाडूने (tamilnadu) २ विकेट्स राखून सौराष्ट्रवर (saurashtra) विजय मिळवला.

२६ डिसेंबरला होणार स्पर्धेचा अंतिम सामना
आता विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना २६ डिसेंबरला जयपूरमध्ये खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू संघ आमने सामने असतील. विजय हजारे ट्रॉफीचा इतिहास पाहिला तर, तामिळनाडू संघाने आतापर्यंत पाच वेळा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. तर दुसरीकडे हिमचल प्रदेश संघ एकदाही या स्पर्धेचे जेतेपद जिंकू शकला नाही.

पहिला उपांत्य सामना – हिमाचल प्रदेश विरुद्ध सर्विसेज
तत्पूर्वी शुक्रवारी पहिल्या उपांत्य सामन्यात हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सहा विकेट्सच्या नुकसानावर २८१ धावा केल्या. हिमाचल संघाने पहिल्या २५ षटकात १०६ धावांवर त्यांच्या चार महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर कर्णधार ऋषि धवनने ७७ चेंडूत ८४ धावा केल्या आणि संघाला या धावसंख्येपर्यंत घेऊन गेला. त्याव्यतिरिक्त प्रकाश चोपडाने देखील ७८ धावांची महत्वाची खेळी केली.

त्यानंतर प्रत्युत्तरात सर्विसेज संघ ४६ षटकातत २०४ धावांवर सर्वबाद झाला. सर्विसेजसाठी कर्णधार रजत पलिवालने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. हिमाचल प्रदेशचा कर्णधार ऋषि धवनने गोलंदाजीतही महत्वाच्या चार विकेट्स घेतल्या.

दुसरा उपांत्य सामना – तमिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र
या सामन्यात सौराष्ट्र संघाने ५० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर ३१० धावा केल्या. यामध्ये त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन याने १३४ धावांचा समावेश आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडू संघाने अंतिम चेंडूवर विजय मिळवला. तामिळनाडूसाठी बाबा अपराजितने सर्वाधिक १२२ धावांची खेळी केली. तर वाशिंग्टन सुंदरने ६१ चेंडूत ७० धावा करून महत्वाचे योगदान दिले.

महत्वाच्या बातम्या –

Video: सामना जिंकण्यासाठी फलंदाजाने केली चीटिंग, पंचांना लक्षात येताच संपूर्ण संघाला ठोठावला दंड

‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सर्वकाही

मालिका विजयासाठी कांगारू सज्ज! अशी आहे ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन

व्हिडिओ पाहा –

विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain|क्रिकेटर कमी राजकारणी जास्त असलेला Vizi

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---