इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (आरसीबी) पूर्व संघमालक विजय माल्या सध्या चर्चेत आले आहे. त्याने २२ जूनला सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून तो चांंगलाच व्हायरल झाला आहे. नेमके या फोटोमागचे रहस्य काय की यूजर्सनी त्याला मोठ्या प्रमाणात व्हायरल केले आहे.
माल्याने वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ख्रिस गेलसोबत काढलेला फोटो ट्विटरसह बाकी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टला गेलने रीट्वीट देखील केले आहे. या फोटोला माल्याने, ‘माझा चांगला मित्र ख्रिस्तोफर हेन्री गेलला भेटून आनंद झाला. जेव्हा मी आरसीबीचा संघ विकत घेतला होता तेव्हा बाकी खेळांडूपेक्षा गेलसोबत केलेला करार आजपर्यंत सर्वोत्तम ठरला होता.’
Great to catch up with my good friend Christopher Henry Gayle @henrygayle , the Universe Boss. Super friendship since I recruited him for RCB. Best acquisition of a player ever. pic.twitter.com/X5Ny9d6n6t
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 22, 2022
आरसीबीने या हंगामामध्ये गेल आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिविलियर्स यांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे.
गेल आणि माल्या यांच्या या फोटोला सोशल मीडियावर यूजर्सनी खूपच ट्रोल केले आहे. त्यातील एकाने गेलला उद्देशून लिहिले, ‘गेलला एक विनंती आहे, त्याने विजय माल्याला त्याच्या मजबूत खांद्यावर उचलून भारत सरकारला सोपवावे.’ हे काहीच नाही अधिक यूजर्सनी माल्याला ‘पळकुटा’ म्हटले आहे. त्यातील काहींनी ‘देशात परत या आणि एसबीआयला भेटा’ असे लिहिले आहे.
एका ट्वीटर यूजरने ‘काहीतरी बोला’ असे ट्वीट करत एसबीआयला टॅग केले आहे. त्याला एसबीआयने रिप्लायदेखील देत लिहिले, ‘तुम्हाला झालेल्या असुविधेचे आम्हाला वाईट वाटले. तुमच्या तक्रारीनुसार तुमचे ट्रांझक्शन यशस्वी झाले असून कागदपत्रे तुमच्या शाखेला पाठवले जातील.’
आपको हुई असुविधा के लिए खेद है । कृपया नोट करे की आपके दिए गए कंप्लेंट के अनुसार दिया गया ट्रांसक्शन सफल था , सम्बंधित दस्तावेज आपकी शाखा को भेज दिया गया है.
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 22, 2022
माल्याने त्याच्या किंगफिशर या एयरलाईनसाठी भारताच्या बॅंकाकडून ९००० कोटीचे कर्ज घेतले होते. हे कर्ज त्याने परत न करता तो भारतातून पळून गेला आहे. त्याने २०१७मध्ये कोर्टशी लपवून काही अवैध संपत्ती मुलांच्या नावावर केली होोती. तो सध्या ब्रिटेनमध्ये असून २०१९मध्ये तेथील ब्रिटीश कोर्टात त्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देत परत जाण्यास सांगितले होते. अद्याप त्याला भारतात पाठवले गेले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेला जडेजा इंग्लंडमध्ये ठरणार हीट? नेटमध्ये करतोय कसून तयारी
नादच खुळा! टी२० क्रमवारीत दिनेश कार्तिकची चक्क १०८ स्थानांनी भरारी, इशानचाही टॉप-१०मध्ये ताबा
काय सांगता! सराव सामन्यात भारताविरुद्ध खेळणार बुमराहसह ‘हे’ ४ क्रिकेटर, पाहा कसे आहेत संघ