---Advertisement---

दुखापतींमुळे कारकिर्दीचे नुकसान झाले, ‘या’ खेळाडूने व्यक्त केली खंत

On: शुक्रवार, मे 14, 2021 7:44 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडतो आहे. २०१९ चा वनडे वर्ल्डकप खेळण्याची संधी देखील विजय शंकरला मिळाली होती. मात्र संघात आपले कायमस्वरुपी स्थान त्याला टिकवता आले नाही.
हार्दिक पंड्याने हळूहळू संघातील स्थान पक्के केल्यानंतर तर विजय शंकरला संघात स्थान मिळणे दुरापास्त झाले आहे. नुकतेच त्याने यावर आपले मत व्यक्त केले. कारकीर्दीतील चढउतारांविषयी देखील त्याने मोकळेपणाने भाष्य केले.

दुखापतींमुळे झाले नुकसान
तामिळनाडूच्या विजय शंकरने संघात सातत्याने स्थान टिकवू न शकल्याचे कारण दुखापती असल्याचे सांगितले. सततच्या दुखापतींमुळे भारतीय संघात पुनरागमन करणे कठीण गेल्याचे तो म्हणाला. इंडिया टुडेशी बोलतांना शंकर म्हणाला, “दुखापतींशी झुंज देऊन संघात पुनरागमन करणे, अतिशय कठीण असते. विशेषतः पुनरागमनासाठी अवधी कमी असेल, तर ते अजूनच कठीण असते. ज्यावेळी मी भारतीय संघात होतो त्यावेळी मी फॉर्मात होतो. कुठल्याही स्थानावर फलंदाजी करून धावा काढू शकत होतो. मात्र एकदा संघातून बाहेर गेल्यावर तो फॉर्म देखील खराब होत गेला. दुखापतींमुळे माझे बरेच नुकसान झाले.”

“माझे सर्वोत्तम प्रदर्शन करत राहील”
मात्र विजय शंकरने आपण सातत्याने चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे देखील यावेळी सांगितले. तो म्हणाला, “ज्यावेळी आपल्याला दुखापत होते तेव्हा पुनरागमन करू शकू की नाही, याबाबत मनात संदेह निर्माण होतो. पण मी नेहमी या नकारात्मक विचारांवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. मी आजवर कायम माझे सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथून पुढे देखील माझा तोच प्रयत्न असेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

मनोज तिवारीला मंत्रीपदाच्या शुभेच्छा देताना हरभजनने केले धक्कादायक विधान, लगेच हटवले ट्विट

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केली करारबद्ध खेळाडूंची यादी, या दोघांना मिळाली प्रथमच संधी

कर्णधारपदावरून हटविल्यानंतर अशी होती वॉर्नरची प्रतिक्रिया, प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---