---Advertisement---

विजय शंकरला मिळाले कर्णधारपद, या संघाचे करणार नेतृत्व

On: मंगळवार, डिसेंबर 3, 2019 8:15 PM
---Advertisement---

9 डिसेंबरपासून रणजी ट्रॉफी या भारतातील देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात होत आहे. यावर्षीच्या रणजी ट्रॉफीच्या मोसमासाठी तमिळनाडू संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरकडे सोपवण्यात आली आहे.

तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या निवड समीतीने कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश विरुद्धच्या तमिळनाडूच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ घोषित केला आहे.

या संघाचे नेतृत्व विजय शंकर करेल. तर बाबा अपाराजित उपकर्णधार असेल. या संघात दिनेश कार्तिक, आर अश्विन, मुरली विजय यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

तसेच वॉशिंग्टन सुंदर हा वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असल्याने तो तमिळनाडूच्या पहिल्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यासाठी उपलब्ध नसले. पण तो दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. तो दुसऱ्या सामन्यासाठी संघात आल्यानंतर के मुकुंतला संघातून मुक्त केले जाईल.

https://twitter.com/TNCACricket/status/1201527359116984320

https://twitter.com/TNCACricket/status/1201527997901066240

पहिल्या दोन सामन्यांसाठी तमिळनाडूचा संघ –

विजय शंकर (कर्णधार), बाबा अपराजित (उपकर्णधार), मुरली विजय, अभिनव मुकुंद, दिनेश कार्तिक, एन जगदीसन, आर अश्विन, आर साई किशोर, टी नटराजन, के विग्नेश, अभिषेक तन्वर, एम अश्विन, एम सिद्धार्थ, शाहरुख खान, के मुकुंत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1201871135543058432

https://twitter.com/Maha_Sports/status/1201857077552926728

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---