---Advertisement---

रणजी ट्रॉफीसाठी तमिळनाडू संघाच्या नेतृत्त्वाची धुरा विजय शंकरकडे, ३ नव्या चेहऱ्यांनाही संधी

On: गुरूवार, डिसेंबर 30, 2021 10:46 PM
Tamilnadu
---Advertisement---

नुकतीच भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धा संपली आहे. यानंतर लवकरच रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. तत्पूर्वी तमिळनाडूने त्यांच्या संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील तामिळनाडू संघ रणजी ट्रॉफीच्या एलीट ग्रुप बीचा भाग आहे. ते 13 जानेवारीपासून जम्मू आणि काश्मिर विरूद्ध आपल्या रणजी ट्रॉफी अभियानाची सुरुवात करतील. हा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. हल्लीच तामिळनाडू संघाने सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते आणि विजय हजारे स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते.

येत्या रणजी ट्रॉफी हंगामामध्ये तामिळनाडूचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू विजय शंकर करणार आहे. तर, एमएस वॉशिंग्टन सुंदरला संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास देण्यात आली आहे.

अनुभवी यष्टिरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक रणजी ट्रॉफीसाठी नाही दिसणार. तसेच संघात नवीन तीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. वेगवान गोलंदाज आर सिलबरसन आणि पी सरवना कुमार आणि फलंदाज बी साई सुदर्शन असे तीन नावे चेहरे संघात आहेत.

रणजी ट्रॉफीसाठी तमिळनाडू संघ खालीलप्रमाणे आहे:
विजय शंकर (कर्णधार), एमएस वॉशिंग्टन सुंदर (उपकर्णधार), बी इंद्रजित, बी अपराजित, एन जगदीसन, एम शाहरुख खान, बी साई सुदर्शन, प्रदोष रंजन पॉल, एल सूर्यप्रकाश, एम कौशिक गांधी, व्ही गंगा श्रीधर राजू, संदीप वॉरियर, एम मोहम्मद, आर सिलम्बरासन, पी सरवण कुमार, ए अश्विन क्रिस्ट, एल विघ्नेश, आर साई किशोर, एम सिद्धार्थ आणि आर केविन

तमिळनाडू संघाच्या रणजी ट्रॉफीतील प्रदर्शनाबाबत बोलायचे झाल्यास, या संघाने आतापर्यंत २ वेळा रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले आहे. १९८७-८८ मध्ये या संघाने शेवटचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर बऱ्याचदा अंतिम सामन्यापर्यंत मजल मारूनही त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे यंदा तब्बल ३३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी उंचावत तिसऱ्यांदा हे जेतेपद जिंकण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

पावसामुळे १ दिवस वाया जाऊनही चौथ्या दिनीच भारताचा ऐतिहासिक विजय; कौतुकाने कर्णधार म्हणे, ‘यावरून आमची…’

द. आफ्रिकेवर मोठा विजय मिळवूनही WTC गुणतालिकेत भारताची अशी आहे स्थिती, पाकिस्तान अजूनही पुढेच

प्रो कबड्डी २०२१: ‘बेंगळुरू बुल्स’कडून ‘हरियाणा स्टिलर्स’चे नामोहरम, तब्बल १४ गुणांच्या फरकाने केली मात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---