२००८ ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज एक ट्विट केलं आहे ज्यात त्याने शेतकऱ्यांचं महत्त्व अधोरेखित केले आहे. त्या ट्विटला जोडून त्याने एका शेतकरी बांधवांचा फोटोही प्रसिद्ध केला आहे.
विजेंदरचा ट्विट
No farmer No food No future #SaveFarmers 🙏🏽 pic.twitter.com/QDOQFlBKVq
— Vijender Singh (@boxervijender) April 3, 2017
सध्या देशात शेतकरी दुष्काळ आणि कर्जमाफी या दोन गोष्टींमुळे अडचणीचा मोठ्या प्रमाणावर सामना करत आहे. त्यामुळे विजेंदरने केलेल्या ह्या ट्विटला महत्व आले आहे. खेड्यात वाढलेल्या विजेंदरचे वडील ट्रक ड्राइवर तर आई गृहिणी होती. त्यांनी बऱ्याच हालाकीच्या परिस्थितीत विजयचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे विजयला शेतकरी आणि समाज यांचं चांगल भान आहे.
विजेंदर सध्या प्रोफेशनल बॉक्सिंग खेळात असून सर्व सामन्यात अपराजित आहे.