आयपीएल 2025 पूर्वी अनेक संघांमध्ये मोठे बदल होत आहेत. काही संघांच्या कर्णधारांमध्ये बदल होण्याच्या बातम्या आहेत. तर काहींच्या मुख्य प्रशिक्षक, मेंटाॅर बद्दल बातम्या येत आहेत. नुकतेच पंजाब किंग्जने संघाच्या हेड कोच पदी रिकी पाँटिंगची निवड केली. तर आता राजस्थान राॅयल्सच्या कॅम्पमधून मोठी बातमी समोर येत आहे.
आयपीएल 2025 पूर्वी राजस्थान राॅयल्सनं आपल्या संघात मोठा बदल केला आहे. फ्रॅन्चाईझीनं टीम इंडियाचा माजी सपोर्ट स्टाफ विक्रम राठाैर यांची संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. राजस्थान राॅयल्सनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरुन ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी फ्रॅन्चाईझीनं राहुल द्रविडला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियक्ती केली होती. आता संघात विक्रम राठाैर यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून एंट्री झाली आहे. टीम इंडियासाठी टी20 विश्वचषक 2024 च्या यशामध्ये राहुल द्रविड आणि विक्रम राठाैर यांनी सपोर्ट स्टाफमध्ये मोलाची कामगिरी केली होती.
Rathour bhi, Royal bhi! 💗
T20 World Cup winning coach Vikram Rathour joins our support staff and reunites with Rahul Dravid! 🤝🔥 pic.twitter.com/YbGvoMQyrv
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 20, 2024
कोचिंग भूमिकेत येण्यापूर्वी राठौर यांनी भारतासाठी सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामने खेळून व्यापक अनुभव घेतला आहे. आपल्या तांत्रिक कौशल्यासाठी ओळखले जाणारे राठौर यांनी 2019 ते 2023 या काळात भारताचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले. उदयोन्मुख भारतीय फलंदाजांच्या कामगिरीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात रिषभ पंत, शुबमन गिल आणि केएल राहुल यांसारख्या खेळाडूंना त्यांच्या विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांमध्ये मार्गदर्शन केले. भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकापूर्वी राठौर राष्ट्रीय निवडकर्ता होते. तसेच त्यांनी पंजाब आणि हिमाचलप्रदेशला देशांतर्गत क्रिकेटमध्येही प्रशिक्षक केले आहे.
फ्रँचायझीमध्ये राठौरचे स्वागत करताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला, “अनेक वर्षे विक्रमसोबत जवळून काम केल्यामुळे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की त्याचे तांत्रिक कौशल्य शांत स्वभाव आणि भारतीय परिस्थितीची सखोल जाण यामुळे तो परिपूर्ण आहे. रॉयल्ससाठी आम्ही एक मजबूत संबंध निर्माण केला आहे. ज्याने भारताला महत्त्वाच्या यशासाठी मार्गदर्शन केले आहे आणि मी त्याच्याबरोबर पुन्हा एकत्र येण्यास रोमांचित आहे आणि खेळाडूंची क्षमता वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. आमचा संघ आणि राजस्थान रॉयल्स येथे जागतिक दर्जाचा संघ तयार करणे सुरू ठेवू.”
हेही वाचा-
हसन महमूदची भारताविरुद्धही शानदार कामगिरी, असं करणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या प्रशिक्षकाची आयपीएलमध्ये एंट्री, या संघानं सोपवली मोठी जबाबदारी
बाबर आझमचा इतका मोठा अपमान! पाकिस्तानी खेळाडूनं भर सामन्यात घेतली मजा